ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी कॉग्रेस,कॉग्रेसकडून शिवसेना कमकुवत केली जात आहे 

मुंबई: ईडीचा सिसेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक […]

ताज्याघडामोडी

पाच वर्ष मुख्यमंत्री’पद दिलं तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार?

मुंबई: दोनच दिवसांपुर्वी रामदास आठवले असं म्हणाले की, शिवसेना आणि भाजपानं अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदवाटून घ्यावं. फडणवीसांनाही ते मान्य असेल. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यासाठी हा फॉर्म्युला नवीन नाही. पण जी परिस्थिती आता नव्यानं तयार होताना दिसते आहे त्याला पुन्हा महत्वं आलेलं आहे. संजय राऊत यांनी सामनामध्ये जे रोखठोक लिहिलं आहे. त्यातही त्यांनी यावर शब्द खर्च केलेले आहेत. याचाच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

काँग्रेस नेत्याच्या बंगल्यात महिलेची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं, ‘तुमच्या आय़ुष्यात हवं होत स्थान’

भोपाळ – काँग्रेस नेते आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या भोपाळमधील शाहपूरा परिसरात असलेल्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मृत महिलेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमुळे महत्त्वपूर्ण खुलासा होण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुसाईड नोट जप्त केली […]

ताज्याघडामोडी

फडणवीसांचा कायदा टिकला असता तर इथे यावं लागलं नसतं, उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलीय. त्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू भाजपकडे टोलवला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी […]

ताज्याघडामोडी

ऑक्सिजन प्लांटसाठी केंद्राकडून राज्याला एक पैसाही नाही; काँग्रेसची टीका

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण येत आहे. याशिवाय आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून महाराष्ट्राला निधी दिला जात नाही. त्यावरून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘पीएम केअर फंडामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणताही निधी […]

ताज्याघडामोडी

आ.प्रणिती शिंदे यांचे खळबळजनक वक्तव्य

सोलापूर, 27 मार्च : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अत्यंत संवेदनशील झाल्याचं चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगत असतानाच कॉंग्रेसच्या आमदार आणि नुतन प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनीही या वादात उडी घेतली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र […]

ताज्याघडामोडी

आणखी एका राजकारण्याचे विवाहबाह्य संबध जाहीर करणार, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड(sanjay rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर […]

ताज्याघडामोडी

भाजपातून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका

भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड केलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास […]

ताज्याघडामोडी

काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरुन वादग्रस्त शब्दाचा वापर

मुंबई, 12 फेब्रुवारी : आज नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे व्यासपीठावरुन अनेक पदाधिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे नानांच्या कार्यक्रमात मानापमानाचं नाट्य रंगलेले पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या सोहळ्यात भाषण देताना चक्क शिवी दिल्याचं समोर आलं आहे. धोनोरकर यांनी व्यासपीठावर भाषण करताना पीएम […]