ताज्याघडामोडी

ऑक्सिजन प्लांटसाठी केंद्राकडून राज्याला एक पैसाही नाही; काँग्रेसची टीका

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण येत आहे. याशिवाय आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून महाराष्ट्राला निधी दिला जात नाही. त्यावरून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘पीएम केअर फंडामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणताही निधी जात नाही’, असे म्हटले आहे.

देशासह राज्यभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने त्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यामध्ये म्हटले, की ‘केंद्र सरकारने जानेवारीमध्ये देशभरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे जाहीर केले होते. त्यातील 33 प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, यातील एकही प्लांट आजपर्यंत कार्यान्वित झालेला नाही. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 10 प्लांट उभारण्यात येणार होते. मात्र, अद्याप केंद्र सरकारने एकाही प्लांटच्या उभारणीचे काम सुरू करणे दूरच साधी टेंडर प्रक्रियाही राबवलेली नाही. पीएम केअर फंडामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणताही निधी दिला जात नाही. हे प्लांट उभारण्याचे काम केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोरमार्फत करण्यात येत आहे’.

दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या संकट काळात ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, वैद्यकीय उपकरणे या सर्वांच्या खरेदी आणि वाटपावर स्वतःचे नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकारांना ती खुल्या बाजारातून खरेदी करता येत नाहीत. केंद्र सरकार ही साम्रगी पुरवत नाही. पीएम केअर फंडामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणताही निधी दिला गेला नाही, असेही म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *