ताज्याघडामोडी

फडणवीसांचा कायदा टिकला असता तर इथे यावं लागलं नसतं, उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलीय. त्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू भाजपकडे टोलवला आहे.

मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतलीय.त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवलेला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही. काय झाले ते सगळ्यांच्या समोरच आहे. त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला यायला लागलं. देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर भेटण्याचा योग यासाठी आला नसता. भाजपलाही हा निर्णय लवकरात लवकर अपेक्षित असायला काही हरकत नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

आरक्षण देण्याचा अधिकार राज्याचा नसून केंद्राचा

आरक्षणाचा न्यायहक्क मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्याचा नसून केंद्राचा आहे. राष्ट्रपती महोदयांचा आहे. आम्ही आमच्या भावना राष्ट्रपती आणि केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. विधिमंडळात हा निर्णय एकमताने घेतलेला होता. त्याचा आदर करून या समाजाला न्यायहक्क मिळाला पाहिजे, अशी आमची भावना आहे. राज्यपालांनी सांगितलं की, आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असंही ते म्हणालेत.

आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू

आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ. आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *