ताज्याघडामोडी

राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोले शरद पवारांच्या बंगल्याकडे रवाना, राजकीय चर्चांना उधाण

राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नाना पटोले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज संध्याकाळी नाना पटोले यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. […]

ताज्याघडामोडी

हिंदुत्व म्हणजे मुस्लीम व शिखांना मारहाण करणे – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हिंदुत्व आणि हिंदूत्ववाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे म्हणत या फरकांचा शोध घेण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे, असं म्हटलं आहे. सेवाग्राम इथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला आज सुरुवात झाली. देशभरातील ३० राज्यातील काँग्रेसचे २०० निवडक पदाधिकारी या शिबीरात सहभागी झाले आहेत. चार दिवस विविध वक्ते या शिबिरात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

काँग्रेस आमदाराच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, घटनेने खळबळ

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या अल्पवयीन मुलाने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आमदार पुत्राला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आमदाराच्या घरातच त्यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडली. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. बरगी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचं हाथी ताल कॉलनीत […]

ताज्याघडामोडी

कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदावर आणि प्रत्येक राजकीय हालचालीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची बारीक नजर होती. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आतुरलेल्या भाजपने आपला पहिला डाव टाकला असून त्याचाच एक भाग म्हणून आज कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली आहे. गेल्या आठ महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये भाजपला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप खासदाराला काँग्रेस कार्यकर्त्यांची पाठलाग करून मारहाण

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरश: गुप्ता यांचा पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण केली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.  […]

ताज्याघडामोडी

माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल; चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक वक्तव्य

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील गुरुवारी एका कार्यक्रमात उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी त्यानंतर माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, असे म्हटले आहे. सर्वांच्याच भुवया चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार अशी […]

ताज्याघडामोडी

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैशांची दिली होती ऑफर” आमदाराचं खळबळजनक विधान

आमदार श्रीमंत पाटील यांनी  खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री आणि कागवडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चांगलीच खळबळ माजली आहे. काँग्रेस सोडण्यासाठी भाजपने पैशांची ऑफर दिली होती, असं श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून […]

ताज्याघडामोडी

काँग्रेस महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढविणार

काँग्रेस पक्ष आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढवेल अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे आज नाना पटोले दिल्लीत असून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राहुल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती नाना […]

ताज्याघडामोडी

पटोलेंचा खळबळजनक आरोप; माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत आहे

काँग्रेसचे नेते नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून फोन टॅपिंग प्रकरणावरुन चर्चेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. ते आज लोणावळ्यातील काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. […]

ताज्याघडामोडी

‘ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर कशाला बोलू?’

 महाविकास आघाडी सरकारम ध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून स्वबळाचा नारा सुद्धा दिला जात आहे. याच दरम्यान नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आणि शिवसेनेवर टीका केली.यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया […]