मुंबई, 12 फेब्रुवारी : आज नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे व्यासपीठावरुन अनेक पदाधिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे नानांच्या कार्यक्रमात मानापमानाचं नाट्य रंगलेले पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या सोहळ्यात भाषण देताना चक्क शिवी दिल्याचं समोर आलं आहे.
धोनोरकर यांनी व्यासपीठावर भाषण करताना पीएम मोदी हे लोकांना … बनवायचं काम करतात, अस वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
खासदार हे सर्व मंत्र्यांच्या आणि महिलांच्या उपस्थितीत हा वादग्रस्त शब्द वापरला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पदग्रहण समारंभाच्या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह काँग्रेस प्रमुख नेते उपस्थितीत होते.आज आपल्या समोर अनेक आव्हानं आहेत. मोदी सरकार मनमानी काम करत आहे, त्याशिवाय केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. हा देशाच्या संविधांवर घाव आहे. चीनने लडाख मध्ये जमीन काबीज केली आता ते सोडायला तयार नाही. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे आव्हान आहे. या निमित्ताने भाजप पाळंमुळं काढली पाहिजे. कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत आम्ही सगळे साथ आहोत.