चंदीगढ 07 मे : देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली असून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात आता समोर आलेल्या एका घटनेनं सर्वांनाच विचारात पाडलं आहे. कारण, प्रचंड मागणी असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन कॅनॉलमध्ये आढळून आले आहेत. यात रेमडेसिवीर आणि चेस्ट इन्फेक्शनच्या इंजेक्शनचा समावेश आहे. […]
Tag: #corona
धक्कादायक! मृतदेहांची अदलाबदल, चूक लक्षात आल्यानंतर पुरलेला मृतदेह काढला बाहेर
लातूर, 07 मे: वैद्यकीय महाविद्यालयातील गलथान कारभार लातुरमध्ये समोर आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर शेळगाव (ता.चाकूर) येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे (वय 65) यांना मागील आठवड्यात कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उदगीर येथे उपचार करून लातूर येथील […]
कोरोना पॉझिटिव्ह माजी ग्रामपंचायत सदस्याची जंगी वाढदिवस पार्टी; रक्तदान शिबीराचंदेखील आयोजन
कोरोना पॉझिटिव्ह असताना रक्तदान शिबीर घेऊन जंगी वाढदिवस साजरा करणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राकेश श्रीपाल कुरणे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत म्हैसाळ तलाठी सुधाकर कृष्णा कुणके यांनी फिर्यादी दिली आहे.राकेश कुरणे हा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला आशा वर्कर आणि आरोग्य सेवकांनी घरी क्वारंटाईन होण्याच्या […]
राज्यातील १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबण्याची शक्यता
मुंबई : 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यात विकत घेण्यात आलेली कोव्हॅक्सिन लस 45 वर्षावरील नागरिकांना देण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी 45 वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु झाला असून त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची […]
धक्कादायक! कोरोनाबाधित वडिलांचा मृत्यू, जळत्या चितेवर मुलीने घेतली उडी
जयपूर, 5 मे: एका 73 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या चितेवर उडी घेत त्यांच्या मुलीने जीव देण्याचा प्रयत्न केला. ही घटना राजस्थानच्या बाडमेरमध्ये घडली. दामोदरदास शारदा असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेत ही महिला 70टक्के भाजली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या राय कॉलनीत राहणाऱ्या दामोदरदास यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रविवारी जिल्हा रुग्णालयात […]
आमदार समाधान आवताडे यांनी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन प्रकल्पास दिली भेट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचे गांभीर्य पाहता पंढरपूर – मंगळवेढा मधील डाॅक्टर यांनी ऑक्सिजन संदर्भात झालेल्या चर्चेनुसार विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी दि.04.05.2021 रोजी टेंभुर्णी येथील एस.एस. बॅग्स ऑण्ड फिलर्स प्रा.लि. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास तात्काळ प्रत्यक्ष भेट दिली. येथील ऑक्सिजन निर्मिती स्वरूप अनुषंगाने येणाऱ्या अडी – अडचणी आ. आवताडे यांनी जाणून घेतल्या […]
पीएमओवर अवलंबून राहणे Useless, कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे सोपवा
कोरोना च्या दुसऱ्या लाटेने देशात मोठी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलंय की कोरोनाविरूद्धच्या लढाचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात यावे. स्वामी यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटलंय की कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्याचा धोका […]
“महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज पण मिळतात फक्त.”
मुंबई | देशासह राज्यात देखील ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात लसीकरण तर चालू केलं आहे पण अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काहींना पहिला डोस लवकर मिळत नाही तर काहींना दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत आहे. यावर आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज आहे, पण फक्त 25 हजार […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची दिल्लीतही दखल
नवी दिल्ली, 4 मे : देशभरात कोविड 19 च्या कहरामुळे परिस्थिती बिघडली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान अनेक राज्यांनी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एक महिना शिव भोजन थाळी मोफत देणार असल्याची […]
राज्य सरकारने विकत घेतल्या सुमारे साडेचार लाख कोवॅक्सिन
पुणे – लसीच्या तुटवड्याचे संकट काही दिवसांपुरते मिटणार असून, मंगळवारी राज्याला ‘कोवॅक्सिन’ लसींचा कोटा मिळणार आहे. राज्याने कोवॅक्सिन लस खरेदी केली असून, ती लवकरच राज्याच्या लसीकरण विभागाच्या ताब्यात मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींचे संकट उभे राहिले असून, पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रांवरील लसीकरण बंद करावे लागले होते. त्यामध्ये जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांचे सेशन्स […]