लातूर, 07 मे: वैद्यकीय महाविद्यालयातील गलथान कारभार लातुरमध्ये समोर आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर शेळगाव (ता.चाकूर) येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे (वय 65) यांना मागील आठवड्यात कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उदगीर येथे उपचार करून लातूर येथील कै. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावाकडे आणला आणि त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार केले.
यानंतर नातेवाईकांनी तोंडार यांचा मृतदेहसोबत घेऊन शेळगाव येथे आले व त्यांनी तोंडारे यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून चव्हाण यांचा पुरलेला मृतदेह काढून घेतला आणि गावाकडे घेऊन गेले. यानंतर तोंडारे यांच्या मृतदेहावर अत्यंसंस्कार केले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर लातूर महानगरपालिकेकडून अंत्यसंस्कार केले जात असतानाही अनेक मृतदेह स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता गावाकडे अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या नंतर महाविद्यालयाकडून एक परिपत्रक काढत कुटुंबीयांच्या चुकीमुळे मृतदेहांची अदलाबदल होण्याचा हा दुर्देवी प्रकार घडल्याचे जाहीर केले आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळं हा प्रकार समोर आलाय.