ताज्याघडामोडी

धक्कादायक! कोरोनाबाधित वडिलांचा मृत्यू, जळत्या चितेवर मुलीने घेतली उडी

जयपूर, 5 मे: एका 73 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या चितेवर उडी घेत त्यांच्या मुलीने जीव देण्याचा प्रयत्न केला. ही घटना राजस्थानच्या बाडमेरमध्ये घडली. दामोदरदास शारदा असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेत ही महिला 70टक्के भाजली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या राय कॉलनीत राहणाऱ्या दामोदरदास यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत होता.

यावेळी मृतदामोदरदास यांच्या लहान मुलीने अंत्यसंस्काराठी येण्याचा हट्ट धरला. त्यामुळे तिला सोबत नेलं. मात्र, मुखाग्नी दिल्यानंतर अचानक तिने जळत्या चितेवर उडी घेतली. तिथे उपस्थित लोकांनी तिला ओढून बाहेर काढलं. मात्र, तोपर्यंत ती 70 टक्के भाजली गेली होती. त्या जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून तिला पुढील उपचारासाठी जोधपूरला पाठवण्यात आले आहे.दरम्यान, मृत दामोदरदास शारदा यांना तीन मुली असून त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. ज्या मुलीने चितेवर उडी घेतली ती सगळ्यात लहान असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर प्रेम प्रकाश यांनी दिली.

या महिलेने अचानक वडिलांच्या चितेवर उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न का केला, याबद्दल माहिती मिळू शकली नाही.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (corona second wave) भारतात भयंकर रुप धारण केलंय. दररोजसाडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडत असून साडेतीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होतोय. रुग्णांचा वेळीच बेड न मिळाल्याने आणि ऑक्सिजनअभावी जीव जातोय.

अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा अपुऱ्या पडत आहेत. देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 82 हजार 315 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 3 हजार 780 रुग्णांचा मृत्यू झालाय. मंगळवारी एकूण 3 लाख 38 हजार 439 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्या 34 लाख 87 हजार 229 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 2 लाख 26 हजार 188 रुग्णांनी प्राण गमावले असून 2 कोटींपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *