ताज्याघडामोडी

राज्य सरकारने विकत घेतल्या सुमारे साडेचार लाख कोवॅक्‍सिन

पुणे – लसीच्या तुटवड्याचे संकट काही दिवसांपुरते मिटणार असून, मंगळवारी राज्याला ‘कोवॅक्‍सिन’ लसींचा कोटा मिळणार आहे. राज्याने कोवॅक्‍सिन लस खरेदी केली असून, ती लवकरच राज्याच्या लसीकरण विभागाच्या ताब्यात मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून लसींचे संकट उभे राहिले असून, पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रांवरील लसीकरण बंद करावे लागले होते. त्यामध्ये जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांचे सेशन्स बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता संपूर्ण राज्यासाठीच लस मिळणार असून, त्यामुळे काही दिवस तरी लसीकरण मोहीम संथ गतीने तरी सुरू राहू शकते.

18 ते 44 वयोगटाला देण्यासाठी लसच मिळत नसल्याने पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू होऊ शकले नाही.दीड कोटी लसीकरणाचा टप्पा राज्याने चार महिन्यांत पूर्ण केला आहे. त्यातून पुढील चार महिन्यांत आणखी आठ कोटी लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. मात्र प्रत्यक्षात लसच उपलब्ध होत नसल्याने हे उद्दीष्ट पूर्ण होईल की नाही, हा प्रश्‍न आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *