गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास

सांगली येथील एका अज्ञाताने पोलीस असल्याचे बतावणी करून आप्पासाहेब पाटीलनगरमधील महिलेचे २ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. हि घटना शनिवारी घडली आहे. मंगल दिलीप नाईक (वय ५८, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, सांगली ) या महिलेने या प्रकरणावरुन सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून शहर पोलिसांकडून त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, […]

ताज्याघडामोडी

नोंदणीकृत फेरीवाल्यांना लवकरच मिळणार राज्य शासनाकडून दीड हजराची आर्थिक मदत

राज्यातील 25 लाख नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी 375 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील 5 लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 75 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 180 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे.ही मदत देतांना सायकल रिक्षाचालकांचाही विचार करण्यात आला आहे. आदिवासी विभागांतर्गत खावटी […]

ताज्याघडामोडी

आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार

कोरोना लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे. देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं. टप्प्याटप्प्याने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपा आमदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या

बुलडाणा, 19 एप्रिल : बुलडाण्यात शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये वाद आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आमदार संजय कुटे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संजय कुटे यांनी हा हल्ला सेनेचे आमदार संजय गायकवाड  यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप केला आहे. ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू

अमरावती, 17 एप्रिल: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून मेळघाटात कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्यानं ही घटना […]

ताज्याघडामोडी

शिवसेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ

बुलडाणा, 19 एप्रिल : कोरोना काळात केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असं राजकारण तापलं असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड सध्या चर्चेत आले आहेत. कारण आमदार गायकवाड यांनी नुकतीच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. देवेंद्र […]

ताज्याघडामोडी

पोलिसांवर दबाव योग्य नाही, वळसे पाटलांनी दिले फडणवीस-दरेकरांवर कारवाईचे संकेत

मुंबई, 18 एप्रिल : राज्यात एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते, असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत […]

ताज्याघडामोडी

खाजगी रुग्णालयातील उपचाराचे दर नियंत्रणात ठेवा – ना.  विजय वडेट्टीवार

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. खाजगी रुग्णालयात कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनमान्य दराने बिलाची आकारणी होते की नाही ते तपासा व खाजगी रुग्णालयातील उपराचाराचे दर नियंत्रणात ठेवा,असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले. […]

ताज्याघडामोडी

एकदा संधी द्या,साडेतीन वर्षात मतदारसंघ ‘मॉडेल’ करेन : समाधान आवताडे

एकदा संधी द्या,साडेतीन वर्षात मतदारसंघ ‘मॉडेल’ करेन : समाधान आवताडे मंगळवेढा-   रिक्त झालेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली, सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र होते मात्र भारतनानांच्या पत्नी ऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले, शेवटी भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवायचे ठरवले, मग उमेदवार कोण असणार अशी चर्चा झाली प्रशांत परिचारक यांनी मतविभाजनाचा फटका लक्षात […]

ताज्याघडामोडी

भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला.नाही… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला.नाही… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचार निमित्त प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेसचे नाना पटोले आणि येथील संत तनपुरे महाराज मठ यामध्ये काँग्रेस मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले कीमाझा मित्र  रवी आमदार भारत नाना भालके यांचे […]