जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. खाजगी रुग्णालयात कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनमान्य दराने बिलाची आकारणी होते की नाही ते तपासा व खाजगी रुग्णालयातील उपराचाराचे दर नियंत्रणात ठेवा,असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले. कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी कंट्रोल रुम तयार करुन त्या माध्यमातून बेड उपलब्ध करुन देण्यात यावे. खाजगी रुग्णालयातील कोविड उपचाराचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी दराचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश द्यावेत असेही त्यांनी सांगितले. अन्यथा त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. प्रायव्हेट हॉस्पिटलला परवानगी देतांना त्यांचे ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
