ताज्याघडामोडी

पोलिसांवर दबाव योग्य नाही, वळसे पाटलांनी दिले फडणवीस-दरेकरांवर कारवाईचे संकेत

मुंबई, 18 एप्रिल : राज्यात एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते, असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.शनिवारी रात्री मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले होते.  मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की, 50 हजार रेमडेसीवीर येत आहे. त्याची चौकशी ब्रुफ्र फार्मा अधिकारी यांनी बोलवले होते, असा खुलासा वळसे पाटील यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *