गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपा आमदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या

बुलडाणा, 19 एप्रिल : बुलडाण्यात शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये वाद आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आमदार संजय कुटे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संजय कुटे यांनी हा हल्ला सेनेचे आमदार संजय गायकवाड  यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप केला आहे.

‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते,’ अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यानंतर बुलडाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला होता.

आज भाजपचे आमदार संजय कुटे हे निषेध करण्यासाठी  बुलडाण्यात आले होते. पण, अज्ञात व्यक्तींनी कुटे यांच्या गाडीवर हल्ला चढवला आणि गाडीच्या काचा फोडल्यात. या घटनेनंतर संतप्त झालेले कुटे यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे. संजय गायकवाड यांच्याच समर्थकांनी आपल्या गाडीच्या काचा फोडल्या असल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे.

जोपर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी बुलडाण्यातून बाहेर पडणार नाही, असा पवित्रात कुटे यांनी घेतली आहे.

रविवारीही माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना नेते विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजप कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढवला होता. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे.

पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गटाना वेगळे करण्यात आले. भाजप नेते योगेंद्र गोडे तथा विजयाताई राठी, प्रभाकर बारे, सोनू बाहेकर, करण बेंडवाल तसंच अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *