ताज्याघडामोडी

एकदा संधी द्या,साडेतीन वर्षात मतदारसंघ ‘मॉडेल’ करेन : समाधान आवताडे

एकदा संधी द्या,साडेतीन वर्षात मतदारसंघ ‘मॉडेल’ करेन : समाधान आवताडे
मंगळवेढा-   रिक्त झालेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली, सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र होते मात्र भारतनानांच्या पत्नी ऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले, शेवटी भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवायचे ठरवले, मग उमेदवार कोण असणार अशी चर्चा झाली प्रशांत परिचारक यांनी मतविभाजनाचा फटका लक्षात घेता यंदा माघार घेतली, मोठ्या मनाने मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांना तिकीट देऊन पाठिंबा दिला. समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा नारळ पंढरपूरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. मंगळवेढ्यात प्रचाराचा शुभारंभ माचनूर गावातील श्री सिद्धेश्वरांचा आशिर्वाद घेऊन करण्यात आला, मागील 15 दिवसाच्या प्रचारात उमेदवार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील 80 गावांसह पंढरपूर येथील 22 गावे, पंढरपूर शहर, तसेच मंगळवेढा शहरात प्रचार सभा, गाव भेट, पदयात्रा, घरभेटी, जाहिर सभा झाल्या, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात यंदा प्रथमच मंगळवेढ्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्याने मंगळवेढ्यातील प्रत्येक गावातून आवताडे यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला, मंगळवेढा संपूर्ण शहर आवताडे यांच्या पाठिशी राहणार असल्याचे चित्र आहे. अनेक ज्येष्ठांनी आवताडे यांना आशीर्वाद देत विजयी भव म्हंटलय. या पंधरा दिवसाच्या प्रचारादरम्यान आवताडे यांनी सुरुवातीला विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला, 35 गावच्या पाणी प्रश्नावर त्यांनी विरोधकांवर भाष्य न करता आजपर्यंत आलेले अपयश का आले यावर भाष्य केले, मंगळवेढ्यातील रस्ते, विजेचा प्रश्न यावर महाविकास आघाडीला लक्ष्य केले, नंतर प्रचारात विरोधकांकडून संत दामाजी कारखान्याच्या 19 हजार अक्रियाशील सभासदांचा  मुद्दा उपस्थित झाला, त्यानंतर आवताडेंनी मात्र थेट हल्ला चढवला, त्यांच्या प्रचारात विठ्ठल साखर कारखान्याचा मुद्दा आला, मात्र संत दामाजी कारखान्याच्या सभासदांना नोटीस देण्यामागील स्पष्टीकरण दिले मात्र एक ही सभासद अक्रियाशील होणार नाही असा शब्द देत विरोधकांचे आरोप खोडून काढले, नंतर आवताडे यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर विरोधक बोलू लागले तेव्हा त्यांनी भालके यांनी बुडवलेली अर्जुन बँक प्रकरणावर तोफ डागली, पंढरपूर शहरातील एमआयडीसीचा विषय प्रचारात आणला.
आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहर तालुक्यात आपला संपूर्ण पांडुरंग परिवार कामाला लागला आहे, त्यांचे बंधू उमेश परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक यांनी प्रचारात जीवाचे रान केले आहे, मंगळवेढा तालुक्यातील युटोपीयन साखर कारखान्याचे सभासद, सोसायटीचे चेअरमन, अर्बन बँके यांच्या माध्यमातून आवताडे यांना प्रचारात बळ दिले आहे, ही निवडणूक हातातून जाणार या भीतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांना तब्बल तीनवेळा या मतदारसंघात फिरावे लागले, चार दिवस मुक्काम करावा लागला आहे त्यामुळे समाधान आवताडे यांच्या उमेदवारीची किती धास्ती राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे दिसून आले.
एकदा संधी द्या, मतदारसंघ ‘मॉडेल’ करेन : समाधान आवताडे
शनिवार 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे, आजपर्यंत अनेकांना तुम्ही निवडून दिले आहे, मी आपला व कामाचा माणूस म्हणून,  एकदा मला संधी द्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या साडेतीन वर्षात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा विकास करून राज्यामध्ये हा मतदारसंघ विकासाचे नवे ‘मॉडेल’ करून दाखवतो त्यासाठी एकदा संधी द्या असे आवाहन भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी मतदारांना केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *