सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हिल विभागाल विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटींव बिल्डिंग मटेरियल अँड कॉंक्रीटिंग या विषयावर एक दिवसीय र्यशाळा संपन्न झाल्याची माहिती सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. शाम कोळेकर यांनी दिली. यावेळी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ शरद पवार व डायरेक्टर डॉ डि एस बाडकर यांनी प्रमुख पाहुण्यां पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यशाळेसाठी अल्ट्राटेक सिमेंट चे सोलापूर जिल्ह्याचे टेक्निकल ऑफिसर राजेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे यांनी ग्राहकांच्या गरजे नुसार काँक्रीट च्या गुणवत्ते मध् बदल करता येऊ शकतात हे पटवून देताना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले . या वेळी विद्यार्थ्यांबरोबरच सांगोला तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गव्हर्नमेंट व खाजगी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते . हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. एस के पवार यांच्यासह सिव्हिल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. हि कार्यशाळा संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .
ताज्याघडामोडी
मित्राने पागल म्हणत चिडवले; तरुण संतापला, घरात जाऊन चाकू आणला, अन् धक्कादायक कृत्य
कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंदर कालरी क्रमांक ६ कोळसा खाण परिसरात एका १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. खून करणारा त्याचा मित्र आहे. सुनील चुन्नीलाल केवट असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी आकाश राजेश राजभर याला अटक केली आहे. भरदिवसा तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण […]
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षक आ.संजयमामा शिंदे यांचा पी.ए.?
पगार शासनाचा आणि काम आमदाराचं ? जनशक्तीचे अतुल खूपसे यांची चौकशी करून कारवाईची मागणी माढा तालुक्यातील निमगाव टें येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येळे वस्ती येथे कार्यरत असलेला प्रविण नवनाथ शिंदे हा शिक्षक शाळेवर शिकवण्या ऐवजी करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक खुलासा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे […]
पंढरपुर महसूल प्रशासनाची अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई
अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील इसबावी, गुरसाळे तसेच शेगांव दुमाला, चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी कारवाई करुन अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे तीन वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी […]
मला एकट्याला टार्गेट केलं जातंय – छगन भुजबळ
मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी नेते छगन भुजबळांवर निशाणा साधल्यानंतर भुजबळांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये हे माझं नाही तर सगळ्यांचं मत आहे. गेले 35 वर्षे मागासवर्गीयांसाठी लढणं हा माझ्या जीवनाचा भाग आहे; पण मला यात एकट्याला टार्गेट केलं जातंय असंही यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं. ते आज (सोमवारी) नाशिकला असता पत्रकारांशी बोलत […]
दवाखान्यात घुसला अन् डॉक्टर दाम्पत्यावर धाड..धाड..धाड, घटनेने अख्खा परिसर हादरला
एका तरुणाने डॉक्टर दाम्पत्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. तिघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर आरोपी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण अमरवाड्यातील खामरा रोड येथील आहे. गुलाबरा छिंदवाडा […]
2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, आता 7 ऑक्टोबरपर्यंत मिळेल संधी, RBI ने जारी केले नवीन परिपत्रक
ज्यांच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा पडून आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा जमा आणि बदलण्यासाठी आधीच निश्चित केलेली तारीख वाढवली आहे. आता 7 ऑक्टोबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा, सामान्य ते विशेष, कोणत्याही बँकेत जमा किंवा बदलून घेता येतील. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर ही 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी […]
भीमाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; खा. महाडिक यांनी दिला शेतकरी समृद्धीचा नवा मंत्र
डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार – चेअरमन विश्वराज महाडिक भिमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर या कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व संचालक, शेतकरी सभासद यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्प लवकरच कारखान्यावर कार्यान्वित होईल अशी ग्वाही यावेळी सभासदांना दिली. […]
रागात जावयानं उचललं मोठं पाऊल, सासऱ्याचं घर पेटवलं आणि….
रागात लोक कधी काय करतील याचा अंदाजही लावू शकत नाही. अनेकदा लोक रागाच टोकाचं पाऊल उचलतात. अशा वादाच्या घटना कायमच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये रागात जावयानं चक्क सासरऱ्यांचं घरच पेटवलं. ही घटना समोर आली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. जावयानं सासऱ्याचं […]
शाळेच्या मैदानात गौतमी पाटीलच्या डान्स वादात, शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय
दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स वादात सापडला आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी हा डान्स झाला होता. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या डान्सचा आनंद लुटला होता. मात्र गौतमीचा हा डान्स वादात सापडला आहे. या डान्सनंतर शालेय शिक्षण विभाग आक्रमक झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यानंतर मोठा […]