ताज्याघडामोडी

मला एकट्याला टार्गेट केलं जातंय – छगन भुजबळ

मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी नेते छगन भुजबळांवर निशाणा साधल्यानंतर भुजबळांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये हे माझं नाही तर सगळ्यांचं मत आहे. गेले 35 वर्षे मागासवर्गीयांसाठी लढणं हा माझ्या जीवनाचा भाग आहे; पण मला यात एकट्याला टार्गेट केलं जातंय असंही यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं. ते आज (सोमवारी) नाशिकला असता पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील दौरे सुरू केले आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. मराठ्यांनी भुजबळांना बळ द्यायचं काम करू नये, असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, इशारे मला द्यायचे असतील तर जरूर द्या; मात्र मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण न द्यावं हे माझं नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, शरद पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले यांचं सगळ्यांचं मत आहे. मी गेले 35 वर्षे मागासवर्गीयांसाठी लढणं हा माझ्या जीवनाचा भाग आहे; पण मला यात एकट्याला टार्गेट केलं जातंय असंही यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं.

मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड येथे मराठा बांधवांसाठी जाहीर सभा घेतली. व्यासपीठावर बोलताना ओबीसी नेत्यांना उपकाराची परतफेड करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्याच सोबत त्यांनी व्यासपीठावर येताच पुन्हा मंत्री छगन भुजबळांवर टीका देखील केली. गेल्या 75 वर्षांपासून मराठा समाजाने ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा, मान, इज्जत वाढवली. आम्ही मराठ्यांनी तुमच्यावर उपकार केलेत. आमच्या बापजाद्यांनी तुमची प्रतिष्ठा वाढवली. आता आम्हाला आरक्षण द्या आणि उपकाराची परतफेड करा, असंही आवाहन मनोज जरांगे पाटलांनी यावेळी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *