ताज्याघडामोडी

शाळेच्या मैदानात गौतमी पाटीलच्या डान्स वादात, शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स वादात सापडला आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी हा डान्स झाला होता.

गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या डान्सचा आनंद लुटला होता. मात्र गौतमीचा हा डान्स वादात सापडला आहे. या डान्सनंतर शालेय शिक्षण विभाग आक्रमक झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवसा विद्यार्थी शिक्षण घेत असतात. दिवसा चालणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र डीजे चे मोठमोठे स्पीकर्स सुरु होते. या स्पिकर्सवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नृत्य करत होती. गौतमीच्या नृत्याने परिसरातील तरुणांची मने भिजवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँड साठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. गौतमीचा महाराष्ट्रातील प्रत्येक नाच गाण्याचा कार्यक्रम हा नेहमीच वादग्रस्त ठरतो. त्याप्रमाणे गौतमीच्या या डान्सनंतरही वाद उत्पन्न झाला आहे. 

शाळेच्या मैदानात डान्सचा प्रकार घडला असेल तर तो नक्कीच धक्कादायक आहे. संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा यावेळी केसरकर यांनी केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत अशाप्रकारे नृत्याचे प्रकार होऊ शकत नाही. याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे केसरकर यावेळी म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *