अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील इसबावी, गुरसाळे तसेच शेगांव दुमाला, चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी कारवाई करुन अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे तीन वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी विविध 17 पथकांची नेमणूक केली आहे.
गुरसाळे येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी महिंद्रा पिकअप, इसबावी हद्दीतील पंढरपूर न.पा पाणी पुरवठा योजना येथे 1ऑक्टोबर रोजी अशोक लेलॅड , शेगांव दुमाला येथे दिनांक 2 ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. तसेच चंद्रभागा वाळवंट रेल्वे गेट जवळ दीड ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून तो साठा शासकीय धान्य गोदाम येथे ठेवण्यात आला आहे.
पथकात अपर तहसलिदार तुषार शिंदे, मंडळ अधिकारी रिगन चव्हाण, विजय शिवशरण, बाळासाहेब कदम, बाळासाहेब मोरे, अव्वल कारकुन बी.टी. फंड, जे. एम कुंभार, तलाठी प्रशांत शिंदे, अझर पठाण, प्रमोद खंडागळे, समाधान शिंदे, राहुल गुटाळ,मूसाक काझी, कोतवाल कृष्णा इंगळे सहभागी होते.