सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हिल विभागाल विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटींव बिल्डिंग मटेरियल अँड कॉंक्रीटिंग या विषयावर एक दिवसीय र्यशाळा संपन्न झाल्याची माहिती सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. शाम कोळेकर यांनी दिली. यावेळी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ शरद पवार व डायरेक्टर डॉ डि एस बाडकर यांनी प्रमुख पाहुण्यां पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यशाळेसाठी अल्ट्राटेक सिमेंट चे सोलापूर जिल्ह्याचे टेक्निकल ऑफिसर राजेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे यांनी ग्राहकांच्या गरजे नुसार काँक्रीट च्या गुणवत्ते मध् बदल करता येऊ शकतात हे पटवून देताना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले . या वेळी विद्यार्थ्यांबरोबरच सांगोला तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गव्हर्नमेंट व खाजगी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते . हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. एस के पवार यांच्यासह सिव्हिल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. हि कार्यशाळा संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .

