ताज्याघडामोडी

धक्कादायक | व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने माजी सैनिकाने गमावले प्राण, दहा दिवस सुरु होती धावपळ

बीड : बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशातच योग्य वेळी वैद्यकीय सोय उपलब्ध न झाल्याने एका माजी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्या माजी सैनिकांचा वाटेत मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना […]

ताज्याघडामोडी

सरकारी धोरणांविषयी नाराजी व्यक्त करत केंद्राच्या कोरोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा

नवी दिल्ली – केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन साथरोगतज्ज्ञ शाहिद जामील यांनी राजीनामा दिला आहे. भारतामधील काही वैज्ञानिकांचा कोरोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला होता. या गटाचे जामील हे प्रमुख होते. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी हे पद सोडत असल्याचे जाहीर केलं. […]

ताज्याघडामोडी

‘अजितदादा बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का?’

राज्य शासनाच्या सरकारी नोकरीमधील पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णयावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. अजित पवार बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का? आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का? असा संतप्त सवाल पडळकर यांनी केला आहे. तसंच अजितदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस असून तुमचे सरकार […]

ताज्याघडामोडी

DRDOने विकसित केलेले कोरोना प्रतिबंध औषध 2-DG आजपासून मिळणार

देशभरात कोरोना दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीसह कोरोना प्रतिबंधात्मक औषधाच्या आपात्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया मंजूरी दिली जात आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषध २ डीऑक्सिजी-डी ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose ) ला काही दिवसांपूर्वी डीजीसीआयने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. आजपासून 2-DG कोरोनावरील औषध […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात टोळीयुद्धातून गुंडाचा खून लव यू भाऊ असं म्हणत अंत्ययात्रेला तुफान गर्दी

पुण्यात गुंडाची सुटका झाल्यानंतर जेलबाहेर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी तुम्ही पाहिली असेल, त्यानंतर थाटामाटात मागे पुढे चारचाकी गाड्यांसह भाऊंचे स्वागत करण्यासाठी मित्र परिवार आलेला असतो. आता पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती, लव यू भाऊ असं म्हणत त्यांनी दु:खही व्यक्त केलं, या घटनेची पुणे शहरात नागरिकांमध्ये […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीकडून पतीचा खून, मुलगाही होता सहभागी, गुपचूप उरकला अंत्यविधी, ‘असं’ पडलं पितळ उघडं

औरंगाबाद : पती रोज दारू पिऊन त्रास देतो म्हणून चक्क त्याच्या पत्नीने त्याचा ‘काटा’ काढल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील हुसेनपूर येथे घडली आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, सदर पत्नीने आपल्या पतीची हत्या आपल्या मुलाच्या मदतीनं केली आहे. मृत पती दररोज दारू पिऊन घरी येतो आणि त्रास देतो. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून आरोपींनी दारुच्या […]

ताज्याघडामोडी

यापूर्वी कोविशील्डचा पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस ठरलेल्या वेळेतच मिळणार

कोविशील्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. त्यासंबंधी बदल आता कोविन पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कोविशील्ड लसीबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे. म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहेत. मात्र, आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच […]

ताज्याघडामोडी

ना.दत्तात्रय भरणे यांच्यावरील टीका थाबवा अन्यथा आंदोलन

भवानीनगर -उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी 22 गावांना मंजूर केल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.ही टीका थांबवा, अन्यथा सावता परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य सावता परिषदेचे मुख्य संघटक संतोष राजगुरू व तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी दिला. राजगुरू, नेवसे म्हणाले की, इंदापुरातील अनेक शेतकऱ्यांच्या उजनी धरणाच्या निर्मितीसाठी जमिनी गेलेल्या […]

ताज्याघडामोडी

लसीकरणाबाबत नव्याने पुढे आला निष्कर्ष

नवी दिल्ली 16 मे : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेत आणखीच भर टाकत आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत लसीकरण हे सर्वात मोठं आणि महत्तावाचं हत्यार मानलं जात आहे. अशात नुकतंच लसीकरणाबाबत झालेल्या नव्या अभ्यासात असा खुलासा झाला आहे, की लस घेतलेले 97.38 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गापासून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर ६२ तर तालुक्यात पुन्हा २८६ कोरोना बाधितांची भर 

पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने चिंतेत भर पडली असून आज प्राप्त झालेल्या अहवालात पंढरपूर शहरात ६२  तर ग्रामीण मध्ये २८६ तर कोरोना बाधितांची भर पडली आहे. सध्या पंढरपुर शहर व तालुक्यातील २७५४ कोरोना बाधित उपचार घेत आहेत.आणि हा आकडा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे.