ताज्याघडामोडी

ना.दत्तात्रय भरणे यांच्यावरील टीका थाबवा अन्यथा आंदोलन

भवानीनगर -उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी 22 गावांना मंजूर केल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.ही टीका थांबवा, अन्यथा सावता परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य सावता परिषदेचे मुख्य संघटक संतोष राजगुरू व तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी दिला.

राजगुरू, नेवसे म्हणाले की, इंदापुरातील अनेक शेतकऱ्यांच्या उजनी धरणाच्या निर्मितीसाठी जमिनी गेलेल्या आहेत. त्यामुळे इंदापूरसाठी उजनीतून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी मिळावेम्हणून इंदापूरसाठी उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी मंजूर करून घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करीत आहेत.राज्य सावता परिषदेच्या वतीने या टीकेचा जाहीर निषेध करीत आहोत, असे राजगुरू व नेवसे यांनी सांगितले.

संघटनेच्या वतीने दत्तात्रय भरणे यांचे अभिनंदन करण्यात आले. वेळप्रसंगी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री भरणे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाईल, असेही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.राजगुरू व नेवसे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी राज्यमंत्री भरणे प्रयत्नशील होते. अखेर त्यांनी इंदापूर तालुक्‍यासाठी उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी मंजूर करून घेतले आहे.

मात्र, सोलापूर जिल्ह्यातील नेते त्यांच्यावर टीका करीत आहेत. तसेच आंदोलने करीत आहेत, याचा आम्ही निषेध करीत आहोत. यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे, युवक आघाडी तालुकाध्यक्ष अमर बोराटे, कार्याध्यक्ष मच्छिद्र भोंग, उपाध्यक्ष विष्णू झगडे, रामदास बनसोडे, सचिन शिंदे, अजय गवळी यांच्यासह सावता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *