ताज्याघडामोडी

DRDOने विकसित केलेले कोरोना प्रतिबंध औषध 2-DG आजपासून मिळणार

देशभरात कोरोना दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीसह कोरोना प्रतिबंधात्मक औषधाच्या आपात्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया मंजूरी दिली जात आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषध २ डीऑक्सिजी-डी ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose ) ला काही दिवसांपूर्वी डीजीसीआयने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. आजपासून 2-DG कोरोनावरील औषध उपलब्ध होणार आहे. या औषधाच्या पहिल्या खेपचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज सकाळी १०.३० वाजता व्हिसीच्या माध्यमातून झाले.

तसेच येत्या जून महिन्यापासून दर आठवड्याला एक लाख डोस तयार करण्यास सुरुवात करणार आहेत. हे औषध पाण्यात विरघळणारे असून लवकरच हे औषध इतर रुग्णालयातही उपलब्ध होणार आहेत.

डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबोरिटरीजच्या सहकार्याने 2-DG हे कोरोना प्रतिबंधात्मक औषध तयार केले आहे. गेल्या वर्षभरापासून या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल सुरू होत्या. विशेष म्हणजे ज्या रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला, त्यातील ४२ टक्के रुग्णांना तिसऱ्या दिवशी ऑक्सिजनची गरज भासली नाही. तसेच ते रुग्ण लवकरच बरे झाले. शिवाय या औषधाचा ६५ वर्षांवरील रुग्णांवरही चांगला प्रभाव दिसून आला. हे औषध इंजेक्शन नसून तोंडाद्वारे घेता येणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *