गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात टोळीयुद्धातून गुंडाचा खून लव यू भाऊ असं म्हणत अंत्ययात्रेला तुफान गर्दी

पुण्यात गुंडाची सुटका झाल्यानंतर जेलबाहेर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी तुम्ही पाहिली असेल, त्यानंतर थाटामाटात मागे पुढे चारचाकी गाड्यांसह भाऊंचे स्वागत करण्यासाठी मित्र परिवार आलेला असतो. आता पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती, लव यू भाऊ असं म्हणत त्यांनी दु:खही व्यक्त केलं, या घटनेची पुणे शहरात नागरिकांमध्ये चर्चा आहे. पुण्यात दिवसेंदिवस भाई वाढतायत ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

पुण्यातील स्थानिक गुंडांमधील धुसफूस दिवसेंदिवस वाढत आहे. यात पोलिसांनी जी माहिती दिली आहे, त्यावरुन माधव वाघाटे याला ठार मारण्यात आलं. भाऊ भांडण झाली असल्याचा फोन त्याला आला आणि तो बिबवेवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्री गेला. ओटा मार्केट भागात, आधीच वाट बघत असलेल्या १० जणांनी घेरुन त्याच्यावर सपासप वार केले. यात ट्यूब, लोखंडी रॉड आणि चाकूचा वापर झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. माधव वाघाटे या तेथेच रक्ताच्या थारोड्यात पडलामाधव वाघाटे हा सराईत गुंड होता, या प्रकरणातील आरोपी सावन गवळी,पवन गवळी, गोपाळ ढावरे, सुनील घाटे, शुभम तनपुरे हे बिबवेवाडीतच राहतात.

सराईत गुंड माधव वाघाटे याची अंत्ययात्री काढण्यात आली, यासाठी फक्त २५ लोकांना परवानगी देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. माधव वाघाटेचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात अंत्ययात्रेत सहभागी झाला. अंदाजे सव्वाशेच्या वर बाईक्स या अंत्ययात्रेत सामील झाल्या होत्या. या घटनेची माहिती परिसरातील सीसीटीव्ही वरुन घेण्यात आली, सुरुवातीला १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *