गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीकडून पतीचा खून, मुलगाही होता सहभागी, गुपचूप उरकला अंत्यविधी, ‘असं’ पडलं पितळ उघडं

औरंगाबाद : पती रोज दारू पिऊन त्रास देतो म्हणून चक्क त्याच्या पत्नीने त्याचा ‘काटा’ काढल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील हुसेनपूर येथे घडली आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, सदर पत्नीने आपल्या पतीची हत्या आपल्या मुलाच्या मदतीनं केली आहे. मृत पती दररोज दारू पिऊन घरी येतो आणि त्रास देतो. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून आरोपींनी दारुच्या नशेत त्यांची हत्या केली आहे असल्याचं उघड झाल आहे.

कोणालाही न कळवता गुपचूप मृतदेहावर अंत्यसंस्कार

मृत पतीचं नाव नागुसिंह झंडुलाल नागलोत असून त्यांचे वय ४५ वर्षे इतकं आहे.तर, हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव भागाबाई नागुसिंग नागलोत असं आहे. तर मुलाचे नाव सूरज नागलोत असं आहे. आईने आणि मुलाने नागुसिंह झंडुलाल नागलोत यांची हत्या करून, नागुसिंह यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणालाही न कळवता गुपचूप उरकले होते. त्यांनी नागुसिंह यांच्या अंत्यसंस्काराला कोणत्याही नातेवाईकाला न बोलावता मायलेकरांनी अंत्यसंस्कार केल्यानं या मृत्यमागं काहीतरी घडलं असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास केला असताना, मायलेकानं हत्येची कबुली दिली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नागुसिंग १३ मे रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मृत नागुसिंग १३ मे रोजी रोजी घरी येताना नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला होता. रोजचं पती दारू पिऊन घरी येत असल्याकारणाने पत्नी संतापली आणि पत्नी आणि मुलाचे नागुसिंग यांच्याशी भांडण सुरु झाले. सुरुवातीला कुरुबुर चाललेळे भांडण पतीनं शिवीगाळ केल्यानंतर चांगलेच वाढले, आणि संतापलेल्या पत्नीनं आणि मुलानं दारुच्या नशेत असणाऱ्या नागुसिंग यांना लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नी आणि मुलानं लाकडी दांड्यानं केल्याले जबरी मारहाणीत नशेत असणाऱ्या नागुसिंग यांचा जागीच मृत्यू झाला.

गुप्त पद्धतीनं अंत्यसंस्कार उरकून टाकल्यानं अनेकांना त्यांच्यावर संशय आला

पती मृत झाल्याचे लक्षात आल्यावर पतीला आरोपी मायलेकांनी पलंगावर नेवून ठेवलं होत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला घरी बोलावून नागुसिंग हे दारूच्या नशेत बेशुद्ध झाल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी नागुसिंग यांना तपासले असता ते मृत झाल्याचे पत्नी आणि मुलाला सांगितले. यांनतर आरोपी मुलगा सूरज आणि पत्नी भागाबाई यांनी कोणत्याही नातेवाईकांना न बोलावता परस्पर अंत्यसंस्कार उरकून टाकले. अशा गुप्त पद्धतीनं अंत्यसंस्कार उरकून टाकल्यानं अनेकांना त्यांच्यावर संशय आला होता.

घरात काही ठिकाणी रक्त सांडल्याचे डागही दिसले

दरम्यान, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता, घरात काही ठिकाणी रक्त सांडल्याचे डागही दिसले. त्याचबरोबर मुलगा सूरजच्या अंगावर काही ठिकाणी हाणामारी केल्याचे व्रण आढळले. त्यामुळे संशय अधिक वाढत गेल्यानं पोलिसांनी आरोपी मायलेकाची कसून चौकशी केली असता, पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *