ताज्याघडामोडी

यापूर्वी कोविशील्डचा पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस ठरलेल्या वेळेतच मिळणार

कोविशील्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. त्यासंबंधी बदल आता कोविन पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कोविशील्ड लसीबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे. म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहेत.

मात्र, आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागणार आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आधी 6 ते 8 आठवडे होतं. भारतात आता या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आलं आहे. कोविड वर्किंग ग्रुपने त्याबाबत शिफारस केली होती.लसीच्या उत्पादनात गती आणण्याचे प्रयत्न सुरुदेशात सध्या कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे.

अशावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी सांगितलं की, कोरोना लसीची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादनात गती आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या भारतातील दोन कोरोना लस निर्मिती कंपन्या आहेत त्यांनी आतापर्यंत देशात लसीचा मोठा पुरवठा केला आहे आणि तो सातत्याने जारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *