ताज्याघडामोडी

मनसेचं अखेर ठरलं..! कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा, मात्र..

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलं असताना मनसेने तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र आता मनसेने आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे . मनसे भाजपला पाठिंबा देणारआहे मात्र प्रचारात सहभागी होणार नाही, असं मनसे नेते बाबू […]

ताज्याघडामोडी

डाळींबाच्या बागेत पिकवला कोटींचा गांजा; पोलिसांनी शेतकऱ्यास घेतले ताब्यात

डाळिंबाच्या शेतामध्ये गांजाच्या झाडांची विक्री करण्यासाठी लागवड आणि जोपासणा करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी १ कोटी ५ लाख ७५ हजार ५०० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. अंमली पदार्थांबाबत सातारा जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली. संशयित आरोपी कुंडलिक निवृत्ती […]

ताज्याघडामोडी

आ.रोहित पवार यांच्यावर आणखी एक जबाबदारी; पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात काम करण्याची संधी

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची राज्य विधान मंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे. विधी मंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. पवार यांची अलीकडेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याने त्यांचे राजकीय महत्व वाढत चालल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर […]

ताज्याघडामोडी

शिवजयंतीनिमित्त ३ दिवसीय व्याख्यानमालेचे पंढरपूर येथे आयोजन – अभिजीत पाटील

पंढरपूर येथे१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६फेब्रुवारी रोजी व्याख्याते शिवश्री डॉ.शिवरत्न शेटे व १७फेब्रुवारी शिवश्री यशवंत गोसावी आणि १८फेब्रुवारी रोजी शिवश्री श्रीमंत कोकाटे सर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटलाचा उलगडता […]

ताज्याघडामोडी

लग्नाला झाले होते फक्त ४ महिने, विवाहित पुतणी काकासोबत पळून गेली; घरातील २ लाख रुपये, दागिनेही नेले

हरियाणातील नूह जिल्ह्यातील सीलखो गावात एका महिलेने घरातून २ लाख रुपये रोख आणि सुमारे दीड लाखांचे दागिने घेऊन प्रियकरासह पळ काढला. आपली पत्नी ज्या व्यक्तीसोबत पळून गेली होती ती व्यक्ती आपल्या पत्नीचा काका आहे असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. पीडित पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला […]

ताज्याघडामोडी

अनेकदा प्रपोज करूनही तरुणी ऐकेना, प्रतिसाद देईना; तरुणानं घरावर बॉम्ब फेकला; पण…

जगभरात व्हॅलेंटाईन डेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळीकडे गुलाबी वातावरण आहे. हृदयी वसंत फुलल्यानं प्रेमाचा बहर आला आहे. मात्र प्रत्येकाचा व्हॅलेंटाईन डे गुलाबी नसतो. तमिळनाडूतील मदुराईत याचाच प्रत्यय देणारी घटना घडली. मदुराईतील एका घरावर मोलोटोव कॉकटेल फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला. अनुप्पनदीमधील वडिवेल रस्त्याशेजारी […]

ताज्याघडामोडी

अमेयने ढकललं नाही, मीच घसरुन पडले असेन; ‘जीव घेण्याच्या प्रयत्न’ प्रकरणी प्रियांगीचा दावा

२५ वर्षीय मैत्रिणीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अमेय दरेकर याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून पोलिसांनी अमेयची आई राधिका दरेकर यांचे नाव वगळले आहे. मालाडमधील बीपीओची कर्मचारी असलेल्या प्रियांगी सिंगला १२ नोव्हेंबर रोजी अमेयने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर प्रियांगीने मात्र आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं आठवत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, पुढील […]

ताज्याघडामोडी

जातीमुळे लग्नाला नकार, दोघांनी झोपेच्या १५ गोळ्या घेतल्या, त्यातून वाचले, घरच्यांनी लग्न लावलं..!

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं अगदी सेम असतं… या ओळी प्रत्येक प्रेम प्रकरणात लागू होतीलच, असं नाही. प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं. प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ही वेगळी असते. प्रत्येकाला आपलं प्रेम आयुष्यात मिळतं असं नाही. अनेक प्रेमीयुगुलांना कुटुंबीयांकडून विरोधही होतो. त्यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल प्रेमयुगुलांकडून उचललं जातं. मग या प्रेमाला पूर्णविराम लागतो. पण […]

ताज्याघडामोडी

बायकोला ऑफिसला सोडून आला, घरी आल्यावर नवविवाहीत तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

पुण्यात किरकटवाडी येथे एका नवविवाहीत तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकटवाडी येथील भैरवनाथ नगर येथे ही घटना घडली आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तम सखाराम धिंडले (वय २७, भैरवनाथ नगर, किरकटवाडी, ता. हवेली, मुळ रा. घिसर, ता. वेल्हे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगारवाढ

तुम्ही जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार आहे. केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दुर करण्यात आल्या असून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार […]