ताज्याघडामोडी

मनसेचं अखेर ठरलं..! कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा, मात्र..

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलं असताना मनसेने तटस्थ भूमिका स्वीकारली होती.

मात्र आता मनसेने आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे . मनसे भाजपला पाठिंबा देणारआहे मात्र प्रचारात सहभागी होणार नाही, असं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्यात कसब्यात मुख्य लढत आहे.तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून महाविकास आघाडीचा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून नाना काटे त्यांना लढत देत आहेत. येथे राहुल कलाटे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाआहे.

या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांची नजर होती. आता भाजपच्या विनंतीवरून त्यांना पाठिंबा देत असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. भाजप व मनसे नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र भाजपच्या प्रचारामध्ये मनसे सहभागी होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *