ताज्याघडामोडी

विठ्ठल कारखान्यावर कै.भारत नाना भालके यांची जयंती साजरी

वेणुनगर: दि.१३- पंढरपूर तालुक्‍यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी चेअरमन आमदार कै.भारतनाना भालके यांची जयंती शनिवार दि.१३.०२.२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात आली. या प्रसंगी आमदार कै.भारतनाना भालके यांचे प्रतिमेचे विधीपुर्वक पुजन कारखान्याचे संचालक श्री विजयसिंह देशमुख यांचे शुभहस्ते करण्यात आले. आमदार कै.भारतनाना भालके यांना त्यांचे जयंतीनिमित्त आदरांजली […]

ताज्याघडामोडी

शेगाव दुमाला येथील अनुसुचित जमातीच्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्या कुटुंबासह घेणार चंद्रभागेत जलसमाधी!

पंढरपूर (प्रतिनिधी):- शेगाव दुमाला (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या अनुसुचित जमातीच्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मनोज कोरे या आपल्या कुटुंबासह चंद्रभागा नदीमध्ये जलसमाधी घेणार असल्याची माहिती त्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे  दिली आहे. शेगाव दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंचपदासाठीचे आरक्षण अनुसुचित जमाती महिला जागेसाठी राखीव झालेले आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या दावेदार सौ.कविता मनोज कोरे या एकमेव सदस्य […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अखेर तो ”डॉन ?” तुरूंगातून बाहेर येणार 

पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असली तरी या शहरात ”डॉन” आणि फोल्डमॅन ची कमतरता नाही असे म्हटले जाते.पुणे शहरात प्रचंड हवा असलेले नाव म्हणजे गजानन मारणे होय.नुकतेच मोक्का न्यायालयाने त्याची एका हत्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केल्यानंतर मारणे  आता तुरूंगातून बाहेर येणार आहे.             अमोल बधे खून प्रकरणात निर्दोष झाल्यानंतर आता नीलेश घायवळ टोळीतील […]

ताज्याघडामोडी

बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करणारा ग्रामसेवक सापळ्यात फसला

ग्रामसेवकाला पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे बिल काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथील ग्रामसेवक वैजनाथ चात्रे यांनी तक्रारदार यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिल काढण्यासाठी 2 हजाराची लाच मागितली व ती देताना लातूर येथील लाचलुचपत विभागाने गावच्या ग्रामपंचायतीमध्ये रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे निलंगा […]

ताज्याघडामोडी

ग्रामसभा घेण्यास राज्य सरकारची परवानगी 

अंतर, नियम आणि कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा संमती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करावे लागणार कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. पण, दरम्यानच्या काळात कोरोना विषाणुचा […]

ताज्याघडामोडी

अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सन 2020-21 करिता शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज ऑनलाईन स्वरुपात दि. 01 ऑगस्ट, 2020 पासून स्वीकारण्यात येत असून, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील दि.12 डिसेंबर, 2020 पासून अर्जदार यांचे सोयीकरिता उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक आणि डॉ. […]

ताज्याघडामोडी

अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीची घोषणा 

अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर कुलगुरू कार्याध्यक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या समितीचे अध्यक्ष तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस समितीच्या कार्याध्यक्षा असतील. तसेच या स्मारकामध्ये शिल्पकृती उभारण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथील आणि […]

ताज्याघडामोडी

चर्चा तर होणारच! शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा सोहळा झाला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे या गावाचे सरंपच झाले आहेत. त्यांनी दुपारी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश केला. त्यानंतर बारा बैलांच्या गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. नव्या सरपंचाचे आणि सदस्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. या गावातील उद्योजक जालींदर गागरे यांच्या पुणे येथे अनेक […]

ताज्याघडामोडी

काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरुन वादग्रस्त शब्दाचा वापर

मुंबई, 12 फेब्रुवारी : आज नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे व्यासपीठावरुन अनेक पदाधिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे नानांच्या कार्यक्रमात मानापमानाचं नाट्य रंगलेले पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या सोहळ्यात भाषण देताना चक्क शिवी दिल्याचं समोर आलं आहे. धोनोरकर यांनी व्यासपीठावर भाषण करताना पीएम […]

ताज्याघडामोडी

दीड लाखांचं बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापलं

नागपूर, 12 फेब्रुवारी: लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबीयांना महावितरणाने वाढीव वीजबिलं पाठवली आहेत. अशातचं नागपूर महावितरणाने एका कुटुंबाला तब्बल 1 लाख 43 हजार 300 रुपयांचं वीजबिल पाठवलं आहे. या घटनेमुळे नागपूर महावितरणाचा ओंगळ कारभार समोर आला आहे. लॉकडाऊच्या काळात राज्यसरकारने वीजबिल कमी करण्याचं आश्वासन दिलं असताना नागपूर महावितरणाने नागपूरमधील अब्दुल अल्ताफ यांना ऑगस्ट महिन्यात तब्बल 61 […]