ताज्याघडामोडी

अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीची घोषणा 

अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर कुलगुरू कार्याध्यक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या समितीचे अध्यक्ष तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस समितीच्या कार्याध्यक्षा असतील. तसेच या स्मारकामध्ये शिल्पकृती उभारण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथील आणि इतर तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली उपसमिती गठीत केली जाणार आहे. सात जणांची ही उपसमिती कुलगुरू डॉ. फडणवीस या गठीत करतील. स्मारकासाठी शासनाकडून दीड कोटी तर विद्यापीठ फंडातून दीड कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकूण तीन कोटीच्या निधीची  तरतूद करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रासाठी एक कोटींचा निधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा श्री. सामंत यांनी केली. तसेच महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *