ताज्याघडामोडी

चर्चा तर होणारच! शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा सोहळा झाला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे या गावाचे सरंपच झाले आहेत. त्यांनी दुपारी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश केला. त्यानंतर बारा बैलांच्या गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. नव्या सरपंचाचे आणि सदस्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. या गावातील उद्योजक जालींदर गागरे यांच्या पुणे येथे अनेक कंपन्या आहेत. ते पुण्यातच राहतात. मात्र, गावाशी त्यांचा संपर्क असतो. अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावात विविध कामेही त्यांनी केली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांचे त्यांशी चांगले संबंध आहे.यावेळी त्यांनी गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. या माध्यमातून गावाचा विकास करू, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनाही ते पटले असावे. त्यांनी बहुमताने त्यांच्याकडे सत्ता सोपविली. सरपंचरदाचे आरक्षणही सोयीचे निघाले. त्यामुळे त्यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.आज त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यासाठी गावात मोठा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी ते पुण्याहून हेलिकॉप्टरने आले. गवकऱ्यांनी आपल्या लाडक्या सरपंचाचे जल्लोषात स्वागत केले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसारखा भव्य सोहळा या निमित्त गावकऱ्यांना पहायला मिळाला. यामध्ये सरपंच आणि सदस्यांनी कोणताही भेदभाव न करता, राजकारण न करता गावचा विकास करू, अशी शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *