ताज्याघडामोडी

हिंदुत्व म्हणजे मुस्लीम व शिखांना मारहाण करणे – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हिंदुत्व आणि हिंदूत्ववाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे म्हणत या फरकांचा शोध घेण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे, असं म्हटलं आहे. सेवाग्राम इथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला आज सुरुवात झाली.

देशभरातील ३० राज्यातील काँग्रेसचे २०० निवडक पदाधिकारी या शिबीरात सहभागी झाले आहेत. चार दिवस विविध वक्ते या शिबिरात सहभागी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराची सुरुवात पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली. काँग्रेसच्या विचारधारेवर त्यांनी भाषणात जोर दिला.

“हिंदूत्ववाद आणि हिंदुत्व यात काय फरक आहे? ते सारखेच आहेत का? या दोन्ही गोष्टी समान असू शकतात का? जर त्या समान आहेत, तर त्यांचे नाव समान का नाही? त्यांची नावे वेगवेगळी का आहेत? जर दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, तर आपण हिंदू हा शब्द का वापरतो, हिंदुत्व हा शब्द का वापरत नाही? असे प्रश्न उपस्थित करत त्या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे वेगळ्या आहेत,” असे गांधी म्हणाले.

तसेच “या गोष्टी अशा आहेत ज्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्या आणि समजून घेण्यासाठी लोकांचा एक गट विकसित करणे आवश्यक आहे. जे या दोन्हीमधील फरकांना खोलवर समजून घेत त्यांना वेगवेगळ्या वागणूक आणि कृतींमध्ये लागू करू शकतात,” असे राहुल गांधी म्हणाले.  

पुढे ते म्हणतात, “हिंदूत्व म्हणजे शीख किंवा मुस्लिमांना मारहाण करणे आहे. पण अखलाकची हत्या करणारंही हिंदुत्व होतं का?” असा सवाल त्यांनी केला. “मी उपनिषदे वाचली आहेत आणि ‘तुम्ही निरपराध माणसाला मारावे’ असे कुठेही उपनिषदात लिहिलेले नाही,” असं राहुल गांधी म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *