ताज्याघडामोडी

पटोलेंचा खळबळजनक आरोप; माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत आहे

काँग्रेसचे नेते नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून फोन टॅपिंग प्रकरणावरुन चर्चेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. ते आज लोणावळ्यातील काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याने ते मला सुखाने जगू देणार नाही असा टोलाही पटोले त्यांनी यावेळी लगावला आहे.

राज्यात काँग्रेसची सत्ता आणायची आहे – पटोले

महाराष्ट्र राज्यात आपल्याला सत्ता आणायची असून तसे आश्वासनही मी सोनिया गांधी यांना दिले आहे. सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणीही घाबरायचे नाही असे सल्ला पटोले यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला.मी इथं आहे याचा रिपोर्ट गेला असेल आयबी आणि पोलिसांना आपला दररोजचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर करावा लागतो. राज्यात कुठे काय सुरू आहे? कुठे आंदोलन होत आहे? याची संपूर्ण माहिती यांना असते. मी इथे आहे याचा देखील रिपोर्ट गेला असेल असा टोलाही पटोले यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *