ताज्याघडामोडी

राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोले शरद पवारांच्या बंगल्याकडे रवाना, राजकीय चर्चांना उधाण

राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नाना पटोले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले आहे.

त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज संध्याकाळी नाना पटोले यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर नाना पटोले थेट शरद पवार यांचे निवास्थान असलेले सिल्व्हर ओककडे रवाना झाले आहे. नाना पटोले यांना या भेटीबद्दल विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पण, नाना पटोले राजभवनावरून राज्यपालांची भेट घेऊन सिल्वर ओकच्या दिशेने रवाना झाले आहे. शरद पवारांसोबत काही महत्त्वाच्या विषयावर बैठक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची यादी जाहीर, कोल्हापूरमधून सतेज पाटील Vs महाडिक रंगणार सामना विशेष म्हणजे, आज दुपारीच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब, अजित पवार यांची बैठक पार पडली होती. अडीच तासांपेक्षा जास्त वेळही बैठक सुरू होती.

ST कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर काय तोडगा निघू शकतो यावर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी राज्यातील इतर घडामोडींवरही चर्चा झाली. हायकोर्टाचा समीर वानखेडेंना दणका, नवाब मलिकांना रोखण्यास दिला नकार दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडू ५ उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहे.

प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. काँग्रेसकडून सुद्धा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. कोल्हापूरमधून सतेज पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर धुळ्यातून गौरव वानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच निमित्ताने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाना पटोले आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठल्या मुद्यावर बैठक होते, हे पाहण्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *