देशात कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढत असून अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन अभावी अनेक रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयांना दिवसागणिक कठीण होत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. अशात मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांचे हाल काही संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान अशीच काहीशा परिस्थितीचा सामना रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनाही […]
Tag: #corona
धक्कादायक प्रकार! कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्यांना सोसायटीने काढलं घराबाहेर
पुणे, 26 एप्रिल: सध्या देशभरात उद्भवलेल्या कोविड-19च्या दुसऱ्या लाटेतीलभीषण परिस्थितीत माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना घडत असतानाच दुसरीकडे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात कोरोनाया रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसना घरातून बाहेर काढल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात समजुतीनं प्रश्न न सुटल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुणे मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, कात्रज कोंढवा रोडवरील […]
70 हजार रुपयांना 1 रेमडेसीवीर विकणाऱ्या 3 मेडीकल दुकानदारांस अटक
देशभरात रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई, नागपूर यांसह अनेक ठिकाणी रेमेडीसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता दिल्लीत रेमडेसीवीर इंजेक्शन तब्बल 70 हजार रुपयांना विकणाऱ्या मेडीकल दुकानदारांस अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मीरारोडमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल […]
रेमडेसिवीरसाठी आमदाराने मोडली 90 लाखाची एफडी
हिंगोली : सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येतो. याच चाकोरीत रेमडेसिविर इंजेक्शनही अडकले. त्यामुळे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची मुदत ठेव मोडून 90 लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करुन दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इंजेक्शनचा स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत […]
मोफत लस देण्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस, राष्ट्रवादीच्या घोषणेनं वाद?
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी महाविकासआघाडी राज्यात मोफत लस देईल आणि याबाबत केबिनमध्ये निर्णय होईल असे बोलून दाखवले त्यानंतर मग सायंकाळी शिवसेनेचे नेते कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला लस देणे सरकारची भूमिका आहे, त्यामुळे लोकांना मोफत लस देण्याचे सूचक वक्तव्य केले होते. पण काही क्षणातच आदित्य ठाकरे यांनी स्वतःचे […]
पुन्हा एकदा नकोसा जागतिक विक्रम!
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा उद्रेक रोज नव्या पातळीवर पोहचत असल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासात पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशात एका दिवसात सुमारे साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. झाली आहे. ही आतापर्यंतची […]
कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर
अखेर भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये असणार आहे. तर […]
लॉकडाऊनमुळे दुकानं बंद, दारूची तहान सॅनिटायझरनं भागवली; 7 जणांचा मृत्यू
यवतमाळ, 24 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणू वेगात पसरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी दारूची दुकानं बंद असल्यानं अनेकांनी दारुला पर्याय म्हणून सॅनिटायझर प्यायला सुरुवात केली आहे. यवतमाळमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील काही लोकांनी गावात दारू मिळत नसल्यानं सॅनिटायझरचं प्राशन केलं आहे. त्यामुळे सात […]
संकटाच्या काळातही Remdesivir चा काळाबाजार!
अकोला, 24 एप्रिल: कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातलं आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आणखी बिकट आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनची आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणावत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. आपल्या जीवाभावाचा माणूस जीवंत राहावा यासाठी नातेवाईक वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार आहेत. अशा परिस्थितीत अकोला शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारही वाढला […]
नियम पाळण्यासाठी सरपंच घालताहेत ग्रामस्थांना दंडवत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू करीत निर्बंधही कडक केले आहेत. शहरासह गावातही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. तरीही अनेक ग्रामस्थ बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसत आहे. हे संकट टाळण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले. दवंडी दिली तरीही ते ऐकत नाहीत. गावच्या पारावर गप्पा मारत बसतात. अशा ग्रामस्थांसमोर शेवटी कामरगावच्या सरपंचाने साष्टांग दंडवत घालणे सुरू केले आहे. त्यानंतर […]