ताज्याघडामोडी

पुन्हा एकदा नकोसा जागतिक विक्रम!

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा उद्रेक रोज नव्या पातळीवर पोहचत असल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासात पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे.

देशात एका दिवसात सुमारे साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

आज सकाळी जाहीर झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या२४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नवीन रुग्ण आढळले आहेत.

त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ एवढी झाली आहे. दुसरीकडे या काल दिवसभरात 2767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत मृतांची संख्या 192311 पर्यंत वाढली आहे. देशातील कोरोनामधील सक्रिय रूग्णांची संख्या 26 लाखांची संख्या ओलांडून 26,82,751 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *