गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

संकटाच्या काळातही Remdesivir चा काळाबाजार!

अकोला, 24 एप्रिल: कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातलं आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आणखी बिकट आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनची आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणावत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. आपल्या जीवाभावाचा माणूस जीवंत राहावा यासाठी नातेवाईक वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार आहेत. अशा परिस्थितीत अकोला शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारही वाढला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरून त्यांच्याकडून अवाढव्य पैसे उकळण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

अशा घटनांची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी आता तातडीनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अकोला शहराच्या स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चार ते पाच जणांना अटक केली आहे. अकोल्यात सध्या लशीसोबतच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन दुप्पट करावं, तसेच काळा बाजार होऊ नये यासाठी अधिकतम किरकोळ किंमत (एमआरपी) कमी करावी, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी उत्पादकांना दिली होती. तरीही रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलं आहे.

अशात अकोला पोलिसांनी शहरातील एका मेडिकलवर छापा टाकून 3 रेमडेसिवीर इंजेक्शन ताब्यात घेतले आहेत. दरम्यान 4 ते 5 आरोपींना देखील अटक केली आहे. यावेळी आरोपींकडून 75 हजार रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील रतनलाल प्लँट जवळील एका मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करण्यात आला होता. पण पोलिसांच्या केवळ 3 रेमडेसिवीर इंजेक्शनच हाती लागले आहेत.

यावेळी अकोला पोलिसांनी चार ते पाच जणांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *