ताज्याघडामोडी

रेमडेसिवीरसाठी आमदाराने मोडली 90 लाखाची एफडी

हिंगोली : सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येतो. याच चाकोरीत रेमडेसिविर इंजेक्शनही अडकले. त्यामुळे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची मुदत ठेव मोडून 90 लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करुन दिले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील इंजेक्शनचा स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कोणी सोसायचा म्हणून अशातच एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता. ही बाब आमदार संतोष बांगर यांच्या कानावर पडली त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. मात्र यातून काहीच मार्ग निघत नव्हता. 

यात अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील 90 लाखांची रक्कम उपलब्ध करुन दिली  आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो आमदार बांगर यांनी मिळणार आहे. त्यातही ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही तूर्त उपलब्ध करुन दिली आहे. आता दोन दिवसांत हे इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *