ताज्याघडामोडी

मोफत लस देण्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस, राष्ट्रवादीच्या घोषणेनं वाद?

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी महाविकासआघाडी राज्यात मोफत लस देईल आणि याबाबत केबिनमध्ये निर्णय होईल असे बोलून दाखवले त्यानंतर मग सायंकाळी शिवसेनेचे नेते कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला लस देणे सरकारची भूमिका आहे, त्यामुळे लोकांना मोफत लस देण्याचे सूचक वक्तव्य केले होते. पण काही क्षणातच आदित्य ठाकरे यांनी स्वतःचे पहिले ट्विट डिलीट केले आणि नंतर न या संदर्भामध्ये राज्य सरकारची हाय पावर कमिटी अंतिम निर्णय घेईल असे भूमिका घेतली.

लगेच महाविकासआघाडी तिसरा मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील काँग्रेस पक्षानेच मोफत लसीची मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला आणि आता राज्य सरकार याबाबत निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. सरसकट सगळ्यांनाच मोफत लस देण्यावरून देखील मतभेद असल्याचं देखील समजत आहे. राज्यातली आर्थिक परिस्थिती पाहता सर्वांना मोफत लस देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका वित्त विभागाची असल्याचं समजतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *