ताज्याघडामोडी

बाॅडीबिल्डर मिस्टर इंडिया जगदीश लाड यांचे ३४ व्या वर्षी  करोनामुळे निधन

कोरोना हा किरकोळ आजार आहे त्याचा बाऊ केला जातोय असे म्हणणारे काही महाभाग दिसून येतात त्यांचे डोळे उघडतील असा एक दुर्दैवी बळी कोरोनाने घेतला असून मराठमोळे बाॅडीबिल्डर जगदीश लाड यांचे करोनामुळे निधन झाले आहे. अवघ्या 34 व्या वर्षी त्यांनी बडोद्यात जगाचा निरोप घेतला.       नवी मुंबईत राहणारे जगदीश लाड यांनी गेल्या वर्षांपासून बडोद्यात वास्तव्यास […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बांधकामाच्या वाळुच्या वादातून मध्यस्थी करणार्‍या तरुणाची निर्घुण हत्या

अमरावती : बांधकामासाठी लागणार्‍या वाळुवरुन सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैभव भीमराव तायडे (वय २२, रा. चवरेनगर, अमरावती) असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक तुरट (वय २५), संकेत घुगे (वय २५), शुभम कुकडे (वय २६, रा. अमरावती) यांना अटक केली आहे. ही घटना […]

ताज्याघडामोडी

खळबळजनक! 120 रुग्णांना दिलेलं Remdesivir निघालं खराब

रायगड, 30 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. तसंच अनेक सर्वेंमधून अशी बाब समोर आली आहे की मे महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अशी भयावह परिस्थिती असताना रायगड जिल्ह्यातून आरोग्य यंत्रणेतील गलथान कारभार समोर आहे. कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची रायगडमध्ये 28 एप्रिल रोजी आलेली कोविफॉरची HCL21013 ही […]

ताज्याघडामोडी

होय, आजही प्रामाणिजपणा जिवंत आहे!

अमरावती : एखादी अमानवीय घटना घडली की लगेच लोक म्हणतात माणुसकी कुठे आहे. संपली माणुसकी असे लोक सहज म्हणून देतात पण आजही माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना गोष्टी आपण कोरोना काळात अनुभवतोय. माणुसकीचा व प्रामाणिकतेचा परिचय देणारी एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला सोडलेले 97 हजारांच्या पाचशे […]

ताज्याघडामोडी

पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याने सोडले प्राण

कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना संभाजीनगरात घडली आहे. या घटनेत दिवंगत प्राध्यापक डॉ. संजय नवले यांचे वडील माणिकराव व आई मंदाकिनी हे मृत्यू पावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय माणिकराव नवले (55) यांचे 15 मार्च रोजी उपचार सुरू असताना निधन झाले. […]

ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प-अभिजित पाटील

राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निमित्तीचा ❝पायलट प्रोजेक्ट❞ प्रकल्प आपल्या धाराशिव साखर कारखान्यावर करण्याचे निश्चित झाले. आज वसंतदादा इन्स्टिट्यूटने घेतलेल्या झूम मिटींगमध्ये राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली होती.यामध्ये धाराशिव साखर कारखाना युनिट १,२ व ३ चे चेअरमन अभिजित पाटील हेही सहभागी झाले होते.              सध्या कोविडच्या दुस-या […]

ताज्याघडामोडी

‘भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या’

मुंबई, 23 एप्रिल : ‘अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत,’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रुग्ण दगावल्याने नातेवाईकांंकडून डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड

पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा […]

ताज्याघडामोडी

पोलिसांवर दबाव योग्य नाही, वळसे पाटलांनी दिले फडणवीस-दरेकरांवर कारवाईचे संकेत

मुंबई, 18 एप्रिल : राज्यात एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते, असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला अटक

ठाणे, 9 एप्रिल : ठाण्यात सध्या मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यात आता थेट ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने अटक केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी 15,00,000 रुपयांची लाच मागितली […]