ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प-अभिजित पाटील

राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निमित्तीचा ❝पायलट प्रोजेक्ट❞ प्रकल्प आपल्या धाराशिव साखर कारखान्यावर करण्याचे निश्चित झाले. आज वसंतदादा इन्स्टिट्यूटने घेतलेल्या झूम मिटींगमध्ये राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली होती.यामध्ये धाराशिव साखर कारखाना युनिट १,२ व ३ चे चेअरमन अभिजित पाटील हेही सहभागी झाले होते. 
           
सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा फार मोठा जाणवत आहे.
वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच आपल्या कारखान्याने पुढाकार घेऊन या पायलट प्रकल्प कार्यरतसाठी तयारी लागणा-या परवानगी ना.जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे सांगून लवकर पायलट प्रकल्प कार्यरत करावा असे सांगितले. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींगच्या माध्यमातून हि प्रक्रिया करण्यात येणार आहे.
         
या झूम मिटींगप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री. ना. जयंत पाटील, आरोग्य मंत्री.ना. राजेश टोपे, श्री.दांडेगावकर, बी.बी. ठोंबरे, आ. हर्षवर्धनजी पाटील, आ. रोहित पवार,  शिवाजीराव देशमुख,  एस.व्ही.पाटील, मौज इंजिनिअरींगचे ओक, तसेच राज्यातील प्रमुख कारखान्याचे पदाधिकारी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *