ताज्याघडामोडी

होय, आजही प्रामाणिजपणा जिवंत आहे!

अमरावती : एखादी अमानवीय घटना घडली की लगेच लोक म्हणतात माणुसकी कुठे आहे. संपली माणुसकी असे लोक सहज म्हणून देतात पण आजही माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना गोष्टी आपण कोरोना काळात अनुभवतोय. माणुसकीचा व प्रामाणिकतेचा परिचय देणारी एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला सोडलेले 97 हजारांच्या पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल या मजुराने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिले आहे. रामदास जिचकार असे या मजुराचे नाव आहे. 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील रामदास गोमाजी जिचकार हे सामाजिक वनीकरनाच्या कामावर मोलमजुरी करतात अशातच आज सकाळी दापोरी ते मायवाडी रस्त्यावरील झाडांना पाणी टाकण्याकरिता लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आणण्याकरिता ते गेले असता त्यांना त्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल चिखलामध्ये पडून असल्याचे आढळून आले. 

पाचशे रुपयाच्या एवढ्या मोठ्या नोटा पाहून त्या व्यक्तीच्या मनात स्वार्थ निर्माण होणे साहजिक होते. सापडलेल्या एवढ्या मोठ्या रकम पाहून कुणालाही लोभ सुटणे साहजिकच. पण मोलमजुरी करनाऱ्या रामदास यांच्यातील प्रामाणिकपणा तेथे आडवा आला. लागलीच त्यांनी तेथील वनपाल एस एस काळे यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर सदर नोटाचे बंडल घेऊन रामदास यानी मोर्शी पोलीस स्टेशन गाठले व घडलेला प्रकार सांगून त्या नोटा पोलिसांत जमा केल्या. यामुळे मजुरी करणाऱ्या रामदासने दाखवलेल्या प्रामाणिकते मुळे मोर्शी पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *