कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे नियोजन करा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना पंढरपूर, दि. 28 – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मुक्त, निर्भय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक आयोगाच्या आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशाप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलींद शंभरकर यांनी केले आहे. पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक […]
ताज्याघडामोडी
आ.प्रणिती शिंदे यांचे खळबळजनक वक्तव्य
सोलापूर, 27 मार्च : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अत्यंत संवेदनशील झाल्याचं चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगत असतानाच कॉंग्रेसच्या आमदार आणि नुतन प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनीही या वादात उडी घेतली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र […]
१६ एप्रिल रोजी ‘ते’ विमान आपल्या शेतजमीन,घरावरून जाणार का ?
केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -हैद्राबाद हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास लकवरच राज्यात सुरुवात होणार आहे.नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशच्या माध्यमातून केंद्र सरकार हा प्रकल्प राबवित असून या रेल्वे मार्गावर मुंबई-लोणावळा-पुणे -पंढरपूर-सोलापूर -गुलबर्गा-जाहिराबाद आणि हैद्राबाद हि शहरे असणार आहेत.या रेल्वे मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या हेतूने सर्वेक्षणासाठी खाजगी चार्टर विमान हैद्राबाद ते मुंबई असे १६ एप्रिल रोजी उड्डाण करणार […]
भाजप आमदाराला कपडे फाडून बेदम मारहाण
पंजाबमधील भाजपचे आमदार अरूण नारंग यांना शनिवारी शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. आक्रमक बनलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने नारंग यांचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. केंद्रीय कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. तो विरोध करण्यात पंजाबमधील शेतकरी आघाडीवर आहेत. केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने होण्याच्या घटना घडत आहेत. अशात नारंग यांनी मुक्तसर […]
डमी विद्यार्थ्यांनी दिली तलाठी पदासाठी परीक्षा; बनवाबनवी अशी झाली उघड
पुणे: गेल्या वर्षी जुलै महिन्यात महापोर्टलवरून घेण्यात आलेल्या तलाठीपदाच्या परिक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या जागी डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार नेमीचंद विठ्ठलसिंग ब्रम्हनात (वय ३९, रा. औरंगाबाद) […]
राज्यात आजपासून कडक निर्बंध; रात्री 8 नंतर बाहेर पडाल तर होईल शिक्षा
मुंबई, 27 मार्च: कोरोनाव्हायरसचा प्रकोप राज्यात प्रचंड वाढल्यानंतर आणि आवाहन करूनही लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राज्याने Mission Begin again अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले आहेत. आजपासूनच (27 मार्च मध्यरात्रीपासून) हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे. […]
पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन चा भालके यांना झाहिर पाठींबा
पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन चा भालके यांना झाहिर पाठींबा पंढरपूर (प्रतिनीधी) :- जुनी पेठ पोलीस चौकी येथे माननीय भगीरथ दादा भालके यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनच्या वतीने या सभेत जाहीर पाठिंबा देण्यात आला. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी एक प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली. यावेळी पांडुरंग (तात्या) माने […]
परिचारक सर्मथक नगरसेवक व गावकर्त्यांसोर पुन्हा धर्मसंकट ?
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदार संघ राखीव झाल्याने विजयसिह मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढविण्याच्या निर्णय घेतला मात्र आमदार बबनराव शिंदे आणि संजयमामा शिंदे यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादीतील फूट टाळण्यासाठी स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून विजयदादांना राष्ट्रवादी कॉग्रेसची उमेदवारी देण्यास संमती दिली.मात्र घडले उलटेच.पंढरपूर शहरावर वर्चस्व असून देखील बाहेरील उमेदवार नको […]
पार्किंग फी च्या नावाखाली खंडणी वसुली
नाना पेठेतील अल्पना थिएटरजवळील नागझरी भिंतीलगत बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळाच्या नावाखाली अधिकृत पार्किग नसतानाही रिक्षा आणि दुचाकी चालकांना फसवून आणि धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या आण्णा आंदेकरसह एकावर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 24 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. आंदेकर याच्यासह सागर थोपटे (रा.नाना पेठ) याच्यावर देखील गुन्हा दाखल […]
२६ मार्च पासून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, दि.१७/०३/२०२० पासून भाविकांना श्रींचे दर्शन बंद करण्यात आले होते. मा.राज्य शासनाच्या आदेशानुसार दि.१६/११/२०२० पासून भाविकांना फकत श्रीचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. मा.जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांनी त्यांचेकडील क्र.२०२१/डिसीबी/०२/आरआर/१२४६ दिनांक २५/०३/२०२१ अन्वये फोजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा […]