ताज्याघडामोडी

भाजप आमदाराला कपडे फाडून बेदम मारहाण 

पंजाबमधील भाजपचे आमदार अरूण नारंग यांना शनिवारी शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. आक्रमक बनलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने नारंग यांचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली.
केंद्रीय कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. तो विरोध करण्यात पंजाबमधील शेतकरी आघाडीवर आहेत.

केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने होण्याच्या घटना घडत आहेत. अशात नारंग यांनी मुक्तसर जिल्ह्यात कृषी कायद्यांचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. त्या पत्रकार परिषदेला शेतकरी आंदोलकांकडून विरोध दर्शवण्यात आला होता.त्यापार्श्‍वभूमीवर, नारंग पत्रकार परिषदेसाठी दाखल झाल्यावर शेतकऱ्यांनी त्यांना घेरले. त्यावेळी त्यांना काळे फासण्याचाही प्रयत्न झाला. स्वत: नारंग यांनी त्यांना मारहाण झाल्याची माहिती नंतर दिली. नारंग यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचे बळ सुरूवातीला शेतकऱ्यांपुढे कमी पडले. पोलिसांनी कसाबसा नारंग यांचा बचाव करून त्यांना संतप्त शेतकऱ्यांपासून दूर नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *