ताज्याघडामोडी

१६ एप्रिल रोजी ‘ते’ विमान आपल्या शेतजमीन,घरावरून जाणार का ?

केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -हैद्राबाद हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास लकवरच राज्यात सुरुवात होणार आहे.नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशच्या माध्यमातून केंद्र सरकार हा प्रकल्प राबवित असून या रेल्वे मार्गावर मुंबई-लोणावळा-पुणे -पंढरपूर-सोलापूर -गुलबर्गा-जाहिराबाद आणि हैद्राबाद हि शहरे असणार आहेत.या रेल्वे मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या हेतूने सर्वेक्षणासाठी खाजगी चार्टर विमान हैद्राबाद ते मुंबई असे १६ एप्रिल रोजी उड्डाण करणार असून ७११ किलोमीटर अंतराचा हा रेल्वे मार्ग पंढरपूर तालुक्यातील ज्या भागातून जाणार आहे त्या भागातील शेतजमिनीचे संभाव्य संपादन आणि नकाशे तयार केले जाणार असल्याचे समजते.       

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहराला जोडणारे तिऱ्हे मार्गे सोलापूर रस्ता वगळता सर्वच रस्त्याचे चौपदरीकरण व कॉक्रीटीकरण करण्याचे काम अंतिम टप्यात आहे.तर पंढरपूर ते फलटण या रखडलेल्या रेल्वे मार्गाचे काम हाती घ्यावे अशी अपेक्षा या शहर तालुक्यातील जनतेची असतानाच थेट हायस्पीड अर्थात बुलेट ट्रेनने पंढरपूर शहर पुणे-मुंबई व हैद्राबादशी जोडले जाणार असल्याने समाधान व्यक्त होत असतानाच या रेल्वे मार्गात येणाऱ्या शेतजमिनी,राहती घरे आदींचे संपादन करताना मोठा मोबदला दिला जणार असल्याची चर्चा आहे.           

त्यामुळे १६ एप्रिल रोजी मुंबई -हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचा सर्व्हे करणारे विमान तालुक्यातील कोणत्या भागातून जाते याकडे जनतेचे लक्ष लागणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *