ताज्याघडामोडी

परिचारक सर्मथक नगरसेवक व गावकर्त्यांसोर पुन्हा धर्मसंकट ?

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदार संघ राखीव झाल्याने विजयसिह मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढविण्याच्या निर्णय घेतला मात्र आमदार बबनराव शिंदे आणि संजयमामा शिंदे यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादीतील फूट टाळण्यासाठी स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून विजयदादांना राष्ट्रवादी कॉग्रेसची उमेदवारी देण्यास संमती दिली.मात्र घडले उलटेच.पंढरपूर शहरावर वर्चस्व असून देखील बाहेरील उमेदवार नको म्हणून शहरातून स्वर्गीय आमदार भालकेंना जनतेने मताधिक्य दिले मात्र मात्र याचे खापर फोडले गेले ते परिचारक सर्मथक काही नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यावर फोडत अकलूजकर भलतेच नाराज झाल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.स्व. सुधाकरपंतांनी राष्ट्रवादी साठी केलेला हा त्याग वाया गेला आणि शेटफळ येथील सभेत दिलेल्या शब्दाप्रमाणे जेष्ठ नेत्यांनी राजकीय पुनर्वसन केले नाही.आणी पुढे परिचारक राष्ट्रवादीतून बाहेर पडले.आता २००९ ची पुन्हा पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होत असून आमदार प्रशांत परिचारक याना भाजपा साठी त्याग करावा लागतो कि काय अशी परिस्थिती या पोट निवडणुकीत निर्माण झाली आहे.तर परिचारक यांच्याशिवाय भाजपने दुसरा उमेवार दिला आणि पंढरपूर शहर व २२ गावात आमदार प्रशांत परिचारक यांच्या अपेक्षेप्रमाणे आपल्या भागातून भाजपच्या उमेदवारास मते मिळाली नाहीत तर मालकांच्या नाराजीचा सामना करावा लागेल अशी धास्तीही अनेक नगरसेवक व गावपुढाऱ्यानी घेतल्याची चर्चा आहे.   

          पंढरपूर शहर व तालुक्याच्या राजकारणात परिचारक आणि भालके हे दोन प्रबळ गट गेल्या १२ वर्षात सत्तासंघर्ष करीत असल्याचे दिसून येते.जवळपास २६ वर्षे पंढरपूर नगर पालिकेवर परिचारक गटाचे वर्चस्व राहिले आहे तर तालुक्यातील पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटात परिचारक हे पुढे राहिले आहेत.तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती या परिचारक सर्मथकांच्या ताब्यात आहेत राहिल्या आहेत.याच बरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती,जिल्हा दूध संघ,जिल्हा बँक आणि जवळपास सर्वच गावच्या सोसायट्या त्यांच्या समर्थकांच्या त्याब्यात आहेत त्यामुळे परिचारक गटाची या शहर तालुक्यात मोठी राजकीय ताकत असल्याचे मानले जाते.त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जुने निष्ठावंत स्व.औदूंबर आण्णा आणि विठ्ठल परिवारास दूर लोटत परिचारकांना जवळ केले होते.मात्र २००९ मध्ये राष्ट्रवादीत तिढा पडला आणि ज्या विजयसिह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी तिढा पडला होता त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास भाग पाडण्यात स्व.सुधाकरपंत परिचारक यांचेच प्रयत्न कारणीभूत ठरले होते.त्यामुळे विजयदादांची नाराजी दूर करण्याच्या हेतूने स्व.सुधाकरपंतांनी आपली हक्काची उमेदवारी त्यांना बहाल केली आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून विजयदादांनी निवडणूक लढविली.    

पंढरपूर शहर व तालुक्याच्या राजकारणावर परिचारक गटाची असलेली मजबूत लक्षात घेऊन विजयदादांनी त्यावेळी निवडणूक लढविली खरी परंतु अगदी नदीच्या घाटाची नावे बदलली जातील यापासून सुरु झालेली चर्चा अकलूजच्या दरबारी राजकारणाच्या सुरस कथांनी व्यापून गेली आणि सामान्य मतदारांनी ”आपला माणूस भला” म्हणत स्व.भालकेंना मतदान केले.त्यावेळी खरेतर परिचारक समर्थक नगरसेवक आणि गावपुढारी यांनी नेटाने प्रयत्न केले होते पण जनतेने नाकारले.     आता पुन्हा २००९ ची पुनरावृत्ती २०२१ च्या पोटनिवडणुकीत होईल आणि जसा राष्ट्रवादीसाठी त्याग केला तसाच त्याग आता परिचारकांना भाजपासाठी करावा लागला आणि आपल्या भागातील मतदारांना पर्यायी उमेदवार नाही रुचला तर करायचे काय ? याच संकटात ”पुन्हा त्याग” करण्याच्या चर्चेने धास्तावलेले अनेक परिचारक सर्मथक असल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *