नवी दिल्ली : शास्त्रज्ञांनी कोरोना विरोधातील नवीन लसीचा शोध लावला असल्याचा दावा करणारी बातमी एका वेबसाइटवर देण्यात आली आहे. संबंधित नवी लस कोरोनाचे सर्व प्रकार आणि अवतार आणि भविष्यात उदभवणाऱ्या संभाव्य अवतारांवरही परिणामकारक ठरणार असल्याचे, थोडक्यात कोरोनाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणारी ठरणार असल्याचे त्या बातमीत म्हटले आहे. त्यामुळेच ही नवीन लस ‘सुपर लस’ म्हणून ओळखली जाणार आहे. […]
ताज्याघडामोडी
आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत आहेत.आहे त्यापेक्षा कडक लॉकडाऊन का लावू नये, असं कोर्टाने विचारलं आहे, पण आहे त्यापेक्षा करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री म्हणाले, “जी काही बंधन आज लावलेली आहेत, त्याहीपेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची […]
रुग्णांच्या नातेवाईकांना Remdesivir आणण्यास सांगू नये, न्यायालयाचा मोठा निर्णय
नागपूर, 30 एप्रिल: राज्यातील विविध भागांत रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असतानाच नागपूरसह संपूर्ण विदर्भाला रेमडेसिवीरचं वाटप चुकीच्या पद्धतीने आणि कमी झाल्याच्या प्रकरणावर दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय देत राज्य सरकारच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. रेमडेसिवीर वाटपावरुन नागपूर […]
बाॅडीबिल्डर मिस्टर इंडिया जगदीश लाड यांचे ३४ व्या वर्षी करोनामुळे निधन
कोरोना हा किरकोळ आजार आहे त्याचा बाऊ केला जातोय असे म्हणणारे काही महाभाग दिसून येतात त्यांचे डोळे उघडतील असा एक दुर्दैवी बळी कोरोनाने घेतला असून मराठमोळे बाॅडीबिल्डर जगदीश लाड यांचे करोनामुळे निधन झाले आहे. अवघ्या 34 व्या वर्षी त्यांनी बडोद्यात जगाचा निरोप घेतला. नवी मुंबईत राहणारे जगदीश लाड यांनी गेल्या वर्षांपासून बडोद्यात वास्तव्यास […]
बांधकामाच्या वाळुच्या वादातून मध्यस्थी करणार्या तरुणाची निर्घुण हत्या
अमरावती : बांधकामासाठी लागणार्या वाळुवरुन सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैभव भीमराव तायडे (वय २२, रा. चवरेनगर, अमरावती) असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक तुरट (वय २५), संकेत घुगे (वय २५), शुभम कुकडे (वय २६, रा. अमरावती) यांना अटक केली आहे. ही घटना […]
कोरोना लस वाटपासंदर्भात केंद्र सरकारने आणली नवी नियमावली
मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या देशभरात दिवसेंदिवस वाढतच असताना शक्य त्या सर्वपरिंनी युद्धपातळीवर कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, लसीच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावरुन यामध्ये अनेक अडचणी उद्भवताना दिसत आहेत. त्यातच आता लसीकरणाबाबत नवी नियमावली केंद्र सरकारने आणली असून, त्यानुसार यापुढे केंद्राकडून पुरवला जाणारा लसींचा साठा हा फक्त शासकीय लसीकरण केंद्रावरच वापरला जाईल. लसींचा ज्या खासगी […]
खळबळजनक! 120 रुग्णांना दिलेलं Remdesivir निघालं खराब
रायगड, 30 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. तसंच अनेक सर्वेंमधून अशी बाब समोर आली आहे की मे महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अशी भयावह परिस्थिती असताना रायगड जिल्ह्यातून आरोग्य यंत्रणेतील गलथान कारभार समोर आहे. कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची रायगडमध्ये 28 एप्रिल रोजी आलेली कोविफॉरची HCL21013 ही […]
मुलाचं निधन झाल्याचं कळताचं मातेनं सोडला प्राण
तेर, 30 एप्रिल: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढतचं चालला आहे. त्यामुळे दररोज असंख्य रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतं आहे. दरम्यानच्या काळात अनेक कुटुंबं परकी झाली आहेत. तर अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबाद याठिकाणी अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती कळताचं घरी आईनंही […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून 26 जणांच्या विरोधात पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. हा प्रकार 27 मार्च […]
‘सामान्य’ पंढरपुरकरात प्रचंड दरारा असलेल्या पोलीस अधिकाऱ्यास लाचखोरीच्या प्रकरणात अटक
भूवैकुंठ समजल्या जणाऱ्या पंढरपूरला जशी भक्तीची परंपरा आहे तसाच संघटीत गुंडगीरी आणि अवैध व्यवसायिकांच्या दहशतीचाही डाग आहे.आपले अवैध धंदे सुरळीत सुरु रहावेत म्हणून राजकीय वस्त्राची झूल पांघरत प्रतिष्ठा प्राप्त करणाऱ्यांची जशी इथे कमी नाही तशीच एखादा अतिशय कर्तव्यकठोर अधिकारी जर या शहरास लाभला तर त्याला देवत्व बहाल करण्यातही येथील जनतेने कधी कसूर ठेवली नाही.तात्कालीन पोलीस […]