ताज्याघडामोडी

आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत आहेत.आहे त्यापेक्षा कडक लॉकडाऊन का लावू नये, असं कोर्टाने विचारलं आहे, पण आहे त्यापेक्षा करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री म्हणाले, “जी काही बंधन आज लावलेली आहेत, त्याहीपेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का असं उच्च न्यायालयाने महाधिवक्तांना विचारलं होतं. मी तुम्हाला विचारतो. मला वाटतं ती वेळ आली असली, तरी तसा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. निर्बंध लावून काय झालं, तर रुग्णसंख्या कमी झाली.

आपण जर बंधन घातली नसती तर आजच्या दिवशी महाराष्ट्रात 9.30 ते 10 लाख सक्रिय रुग्ण असू शकले असते. रुग्णवाढ उताराला लागलेली नाहीये. पण आपण ती 6-6.30 लाखापर्यंत थांबवली आहे. अजूनही काही काळ आपल्याला बंधन पाळण्याची आवश्यकता आहे.”इतर राज्यांनी महाराष्ट्रापेक्षा चांगल्या गोष्टी केल्या असल्यास, त्याचं अनुकरण करण्यास आपण तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

कोव्हिडची तिसरी लाट आली तर त्यावेळी ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी तरतूद करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.राज्यसरकार पावणे तीनशे PSA ऑक्सिजन प्लांट उभारत असून, केंद्र सरकारने 10 प्लांट्स दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यामध्ये हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या दुर्घटनांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ” एक क्षणाची उसंत न घेता सगळी यंत्रं सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना होत आहेत. नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी माझ्याशी बोलताना रडले. ते दिवसरात्र काम करत होते, पण ऑक्सिजन सिलिंडरमध्ये गळती झाल्यामुळे लोकांचे जीव गेले. त्या कर्मचाऱ्यांना दुःख झालं. मी आदेश दिलेत की सगळ्या जंबो सेंटर्सचं फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट करा. अपघात टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *