मुंबई, 12 मे: राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम […]
ताज्याघडामोडी
केमिस्ट अधिकाऱ्याचा मारहाणीनंतर मृत्यू; पोलिसांनी केली राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अटक
साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना मंगळवारी वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. […]
सात दिवसात कोरोना बरा, असा दावा करणाऱ्या कंपनीने जाहीर केली औषधाची किंमत, जाणून घ्या
नवी दिल्ली | कोरोनाने सर्व देशभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारीही कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना वाढत असताना ऑक्सिजन, रेमडेसीविरचा तुटवडा असल्यानेही अनेकजण दगावले. त्यामुळे केंद्र सरकार शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून निघेल या औषधांवर भर दिला आहे. अशातच झायडस कॅडिलाचं विराफिन हे हे अँटिव्हायरल औषध उपलब्ध […]
महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज 71,966 रुग्णांची कोरोनावर मात
मुंबई, 11 मे: महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचं दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona) बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 71,966 रुग्ण कोरोनामुक्त (71,966 discharged today) झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 40,956 नवीन रुग्णांचे […]
फडणवीसांचा कायदा टिकला असता तर इथे यावं लागलं नसतं, उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलीय. त्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू भाजपकडे टोलवला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी […]
निर्दयीपणाचा कळस! होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठी शीतपेयातून दिलं विष; वधूचा प्रताप
यवतमाळ, 11 मे: येथील एका वधुनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयातून विष दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी वधुनं आपला भाऊ आणि मैत्रिणीच्या मदतीनं होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयामध्ये विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण सुदैवानं 10 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर वरानं मृत्यूवर विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यानं रुग्णालयातून बरं होताचं, थेट पोलीस स्टेशन गाठून भावी […]
राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊनची शक्यता; काही बाबी शिथिलही केल्या जाण्याचे संकेत
मुंबई, दि. 11 – राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस आणि अन्य आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले असून, ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता असली तरी त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. […]
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण रखडणार; राजेश टोपेंनी मांडली वस्तुस्थिती
देशात लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे. महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. मात्र, लशींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) […]
आता समोर कोणताच मार्ग दिसत नाही”; व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या
भिवंडी : व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून एका तरुणाने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीमध्ये घडली असून मयूर रामा जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलाजवळ सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. नदीपात्रात शोध सुरु आहे. मयूर हा कल्याण पश्चिम परिसरातील बारावे या गावात कुटुंबासह राहत होता. […]