ताज्याघडामोडी

महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज 71,966 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई, 11 मे: महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचं दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona) बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 71,966 रुग्ण कोरोनामुक्त (71,966 discharged today) झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के इतके झाले आहे.

आज राज्यात 40,956 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 5,58,996 इतकी झाली आहे.

सध्या राज्यात 35,91,783 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,955 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद?

ठाणे – 5024

नाशिक – 6482

पुणे – 11191

कोल्हापूर – 3643

औरंगाबाद – 1930

लातूर – 2872

अकोला – 4376

नागपूर – 5438

एकूण – 40,956

सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 95,731 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात 53,020 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 40,162 तर ठाणे जिल्ह्यात 31,446 सक्रिय रुग्ण आहेत.

बाधितांचा आकडा मोठा

राज्यात आज 793 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 403 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 170 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 220 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *