पती-पत्नीत भांडणं होणं हे काही नवीन नाही. काही वेळा वाद विकोपालाही जातात; मात्र अलीकडच्या काळात पती-पत्नीतल्या वादांनी टोक गाठल्यावर एकमेकांचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहिलं जात नसल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात आग्र्यात घडली आहे. त्यात एका महिलेने आपल्या पतीला विजेचा शॉक देऊन मारल्याचा आरोप आहे. आग्र्यात एका महिलेने आपल्या पतीची […]
ताज्याघडामोडी
दुकान बंद करून माय-लेकी घरात झोपी गेल्या; सकाळी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडताच दृश्य बघून हातपाय लटपटले
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द आईसोबत झोपी गेलेल्या लेकीचा आणि तिच्या आईचा अज्ञातांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. संपदाबाई लक्ष्मण नरळे (वय 75 ) आणि त्यांची मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर (वय 58 ) अशी मृतांची नावे आहेत. संपदाबाई आणि […]
चिमुकली 14व्या मजल्यावरुन खाली कोसळली, खरचटलंही नाही; दोन गोष्टींनी वाचले प्राण
देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याचीच प्रचिती मुंबईतील एका घटनेत आली आहे. मुंबईत इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून 13 वर्षीय मुलीला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.सखीरा शेख, असं या मुलीचं नाव आहे. मंगळवारी पहाटे कुर्ला येथील नेहरू नगर येथे ही घटना घडली. इतक्या उंचावरुन पडूनही मुलीला काहीच न झाल्याने लोक आश्चर्य […]
भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुखाने रेल्वेखाली येऊन जीवन संपवलं
भाजपचे युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ यांनी केली रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर धुमाळ यांनी आत्महत्या केली आहे.सुनील धुमाळ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरा नळीमध्ये धुमाळ राहायला होते. आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसात […]
बापानेच आजीला संपवल्याचा राग, नातवाने जन्मदात्याचा काटा काढला; नेमकं काय घडलं?
पती-पत्नीच्या वादाच्या रागातून सासूच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जावयाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करून आजीच्या हत्येचा बदला घेतला आहे. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी आरोपी सुभाष संतोष शेंडगे याच्याविरोधात वडिलांची हत्या केल्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली. मयत संतोष शेंडगे याने पत्नी भानूबाई व […]
वादातून नातवाने आजीला संपवलं, आई-वडिलांनीही दिली साथ, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मात्र…
जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नुकतीच एक हत्येची घटना समोर आली आहे. क्षुल्लक वाद झाल्याने सुनेने पती आणि मुलाच्या मदतीने वृद्ध सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही थरारक घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामडोंगरी येथे घडली. सुलकाबाई चाचेरे (८०) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी किसन जोंधरू चाचेरे, त्याची पत्नी सेवनबाई (५०) […]
कर्मयोगी इंस्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील पाच विद्यार्थ्याची नागपूर येथील कोलब्रो प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. नागपूर येथील कोलब्रो प्रा. लि या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील हृषीकेश गाजरे, सौरभ गाढवे, हर्षवर्धन नागटीळक, […]
लहान मुलांच्या शाळेच्या वेळा बदलल्या; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असल्यास लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली […]
कधी डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून त्याने 6 महिलांशी केलं लग्न, पण अखेर…
मोठ्या पदावर काम करत असल्याचं किंवा अधिकारी असल्याचं भासवून लग्नासाठी महिलांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना वारंवार घडतात. ऑनलाइन पद्धतीचा यासाठी प्रामु्ख्याने वापर होतो. अशाच प्रकारचं एक प्रकरण पोलिसांनी उजेडात आणलं असून, एका महाठगाला अटक केली आहे. ही व्यक्ती कधी न्यूरोसर्जन, डॉक्टर तर कधी पंतप्रधान कार्यालयातला अधिकारी असल्याचं भासवून महिलांची फसवणूक करत होती. काश्मीरमधल्या कुपवाडा इथल्या […]
चुकून बँक अकाउंटमध्ये आले 26 लाख, पठ्ठ्या परत द्यायलाच नाही तयार; अखेर बँकेने…
ऑनलाइन बँकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अशावेळी आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे चेक करण्यासाठी बँकेत जायची गरज नसते. बँकेत पैसे जमा झाले किंवा विड्रॉल केले तर आपल्याला मेसेज येतो. दरम्यान अनेकांच्या अकाउंटमध्ये अचानक लाखो रुपये जमा झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. असंच काहीसं नोएडामधील एका व्यक्तीच्या बाबतीत घडलं. मात्र या पठ्ठ्याने ही रक्कम परत करण्यासच नकार […]